२८-७-१९४० निश्चयाने, निष्ठेने आणि निमूटपणे कार्य करणारे कार्यकर्ते हवेत - Page 382

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३४४

तुम्ही एकट्याने सोडवावयाचा नाही, हे खरे. तुमच्याप्रमाणे इतरांवरही हा बोजा पडणार आहे आणि इतरांना या कार्यातील आपला योग्य हिस्सा उचलण्याची विनंती करण्यात येईलच. पण तुम्हाला प्रथम बोलाविण्याचे कारण तुम्ही इतर लोकांपेक्षा अधिक संघटित आहात. म्हणूनच तुम्हाला संदेश देणे अधिक सुलभ आहे. तुमच्या संघाचे पाच हजार सभासद आहेत. या सर्व सभासदांकडून

प्रत्येकी दोन रुपयेप्रमाणे एकंदर दहा हजार रुपये तुम्ही जमविले पाहिजेत. पहिल्या महिन्यात प्रत्येकाने एक रुपया द्यावा व नंतर एक महिना सोडून दुसऱ्या महिन्यात

प्रत्येकाने आपल्या हिश्श्याचा दुसरा रुपया द्यावा.

या कामाकरता एक कमिटी नेमण्यात येईल. त्या कमिटीच्या चिटणीसाचे काम श्री. शांताराम अनाजी उपशाम हे करतील. माझ्या सहीची पावतीपुस्तके काढण्यात येतील व त्यातील पावत्या घेऊन ज्याने त्याने आपला हिस्सा पुरा करावा. मला येथे एक स्पष्ट खुलासा केला पाहिजे, तो असा, तुम्ही हा जो पैसा देणार तो युनियनचे सभासद म्हणून नव्हे, तर तुम्ही एक अस्पृश्य जातीचे घटक म्हणून तो पैसा देणार आहात. हा पैसा मडकेबुवांच्या मार्फत वसूल केला जाईल, युनियनच्या मार्फत नव्हे. या फंडावर तुमच्या युनियनचा कोणत्याही प्रकारे अधिकार नाही. तेव्हा हे काम जातीचे आहे, असे जाणून तुम्ही या कार्यास ताबडतोब सुरवात करा, असे तुम्हाला माझे आग्रहाचे सांगणे आहे. आज मला अधिक काही बोलावयाचे नाही.