१-११-१९४० तर खेड्यापाड्यातील अन्यायग्रस्त लोकांना मदत करता येईल - Page 387

. - . तर खड्यापाड्यातील अन्यायग्रस्त लोकांना मदत करता येईल ३४९

या प्रमाणे वार्षिक ४,००० रुपये उत्पन्न होईल, असे वाटते. त्यातून

॥म्युनिरीपल पट्टी, व्याज वगैरे वजा जाता २,५०० रुपये शिल्लक राहातील, असा

| अंदाज आहे. यावरून या जागेवर इमला उठविला तर आपले नुकसान न होता

॥फायदा आहे, असे दिसून येईल.

॥| प्रिय बंधूंनो, अशा तऱहेने दरसाल २,५०० रुपये पुंजी झाली तर खेड्यापाड्यातील लोकांवर इतर स्पृश्य लोकांकडून जो अन्याय करण्यात येतो, त्यास मदत करता येईल. अशा रीतीने खेड्यापाड्यातील लोकांचे संरक्षण होऊन प्रसंग आला असता इकडे तिकडे झोळी पसरण्याचा प्रसंग टळेल.

हे तीन मजले बांधावयाचे झाले तर जागेची किंमत व इमारतीचा खर्च याकरिता

॥एक लक्ष रुपये लागतील. लढाईमुळे सीमेन्ट, लोखंडी वस्तू महाग झाल्या

आहेत. दुसरी गोष्ट या फडाकरिता इतर जातीतून मदत मिळणे कठीण

आहे. धार्मिक लोक आपआपल्या जातीलाच दानधर्म करतात. आपल्या लोकात श्रीमंत लोक नाहीत, आपण काँग्रेसमध्ये नाही. |

हा फंड आपल्या लोकांमधूनच आपण उत्पन्न केला पाहिजे. धनिकांप्रमाणे

[आपल्या लोकांकडून एकदम २००, ५०० किंवा १,००० रुपये देणगी मिळणे कठीण

| आहे. आपल्यातील प्रत्येक माणसाने दोन दोन रुपये देणगी देऊनच ही [रक्‍कम ]

जमली पाहिजे. ठिकठिकाणी इमारत फंड कमिट्या तयार करा आणि आपले

[काम करा. पैसे घेण्यासाठी मीच आपणाकडे यावे, अशी आपली [इच्छा ] असेल

| तर मी येईन पण तुम्हास माहीत आहे की आपल्या समाजाची [जबाबदारी ] [सर्वपरीने ]

माझ्या शिरावर आहे. तेव्हा प्रत्येक ठिकाणी मला बोलविण्याचा [हट्ट ] [धरू ]

नका. असे असूनही आपले प्रेम खरोखरच इतके [वेडे ] [असेल ] [तर ] [मी ] [येईन ]

॥सुद्ध. पण इमारत फंडाच्या कामाच्या बाबतीत [कोणीही ] [कुचराई ] [करता ] [कामा ]

नये, इतके बोलून मी माझे भाषण [संपवितो. ]