१८२
सार्वजनिक कार्यासाठी एकजूट हवी
बी. डी. डी. चाळ नं ९६, वरळी, मुंबई येथील श्री. शंकर नाथा खैरमोडे यांच्या नवीन व्यायाम शाळेचा व डॉ. आंबेडकर स्पोर्टिंग क्लब यांचा सार्वजनिक उत्सव शनिवार ता. २३ नोव्हेंबर १९४० रोजी रात्रौ ९ वाजता मोठ्या थाटाने साजरा] करण्यात आला. उत्सवाचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारावयाचे कबूल केले होते. सभास्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर येताच ' आंबेडकर झिंदाबाद, ' ' आंबेडकरांचा जयजयकार, ' ' थोडे दिनमे भीमराज | अशा गर्जनांनी वातावरण दुमदुमून गेले होते. बाबासाहेब मंडपात येताच| टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने त्यांचे स्वागत करण्यात आले. बाबासाहेबांच्या बरोबर श्री. डी. व्ही. प्रधान, श्री. एम. ए. उपशाम, श्री. पी. एल. लोखंडे श्री. व्ही. एल. केळशीकर, श्री. बी. एस. गायकवाड ही कार्यकर्ती मंडळी हजर
होती.
सभामंडप उत्तमप्रकारे सजविण्यात आला होता. सभेस दहा 'हजार | लोकसमुदाय होता. अध्यक्षाची सूचना श्री. झाल्टे यांनी मांडली. सूचनेस श्री. आर. बी. पगारे यांनी अनुमोदन दिल्यावर श्री. आर. एस. भालेराव यांचे | भाषण झाले. नंतर डॉ. बाबासाहेब यांचे भाषण झाले. ते म्हणाले,
प्रिय भगिनींनो व बंधुंनो,
आज सभेचा वेळ निश्चित कोणता हे पुष्कळ लोकांना ठाऊक नसल्यामुळे | त्यांना भुके ठेवून लांबलचक भाषण करण्याचा माझा इरादा नाही. ज्या कारणासाठी मी आलो आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे.
मी इमारत फंडाचा प्रश्न हाती घेण्याला कोणते कारण घडून आले असेल तर, आपल्या समाजाच्या भविष्यकाळाचे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहाणे हेच होय. माझ्या आयुष्यात जेवढे करणे शक्य होते, तेवढे मी केले आहे. १९१९ साली सार्वजनिक चळवळ सुरू झाली तेव्हा अस्पृश्य समाजात मुळीच जागृती नव्हती. आपण माणसे आहोत याची जाणीवही नव्हती. ब्राह्मण, मराठे, पाटील वगैरे स्पृश्य लोक जोड्यांप्रमाणे आपणास वागवीत होते. सर्प म्हटला की सर्व लोक भितात त्याप्रमाणे पाटील, तलाठी, कुलकर्णी यांना अस्पृश्य समाज.
जनता : ३० नोव्हेंबर १९४०.