१-११-१९४० तर खेड्यापाड्यातील अन्यायग्रस्त लोकांना मदत करता येईल - Page 389

सार्वजनिक कार्यासाठी एकजूट हवी ३५१

घाबरत होता. सुरवातीच्या काळात आपल्या लोकांना म्युनिसीपालिटी,

लोकल बोर्ड, कौन्सिल यामध्ये प्रवेश मिळणे कठीण होते. त्याचठिकाणी आपले लोक स्वाभिमानाने मांडीला मांडी लावून आपल्या हिताकरिता आज झगडत आहेत. (टाळ्या) आपल्यापैकी गृहमंत्री किवा शिक्षणमंत्री झाला असता [पण ] तसा योग आला नाही. जेथे पट्टेवाल्याची जागा देखील मिळणे महाग होती [तेथे ] आपल्यापैकी डेप्युटी कलेक्टर होत [आहेत. ] ज्याने शून्य पाहिले त्यानेच जर शंभर पाहिले, त्याला अभिमान व आनंद [वाटणे ] [स्वाभाविक ] [आहे. ]

आपण आपल्या चळवळीचा पल्ला बराच गाठला आहे, तरीपण आपणास बरेच कार्य अजूनही करावयाचे आहे. ह्या कार्याच्या मार्गात गांधी व काँग्रेस हे दोन अस्पृश्यांना मोठे शत्रू आहेत. नुकत्याच झालेल्या मुलाखतीच्या वेळी व्हाईसरायने गांधींना विचारले ' तुम्हाला स्वराज्य पाहिजे पण तुम्ही राजेरजवाडे, मुसलमान व अस्पृश्य यांची विल्हेवाट काय लावणार ' ? पण गांधी आपल्या पत्रकात म्हणतात ' राजेरजवाडे व मुसलमान यांच्याशी आम्ही तडजोड करू पण

अस्पृश्यांबद्दल विचारणारे तुम्ही कोण ? अस्पृश्यांचे आम्ही वाटेल ते करू. ' राजेरजवाडे व मुसलमान यांच्याशी गांधी तडजोड करण्यास तयार असतात, पण

अस्पृश्य समाजाचा प्रश्‍न सरकारने विचारल्याबरोबर गांधींच्या अंगाचा तिळपापड

होतो. अस्पृश्य समाजाच्या प्रगतीच्या मार्गात हा एक खडक आहे. हा खडक

माझ्या हयातीत नाहीसा करता आला, तर तुमचे भावी आयुष्य सुखकर झाल्याविना

राहणार नाही. (प्रचंड टाळ्यांचा कडकडाट)

मला एक मोठी चिंता वाटत असते ती ही की, आजपर्यंत आपण केलेली एकजूट

व प्रगती तुम्ही पुढे कशी टिकवाल? एक खांबी तंबूत आज तुम्ही

सुखासमाधानाने बसता. पण त्या तंबूचा खांब कोसळला तर मग तुमची काय

स्थिती होईल ? याकरिता त्या तंबूला आजूबाजूला खांब व दोर बांधून मजबूत

करण्याचा मी विचार केला आहे, म्हणूनच इमारत फंड उभारला आहे. हेतू हा

की, माझ्या पश्चात तुमचा कोणीही पराभव करू नये. त्याचप्रमाणे तुम्हास

सार्वजनिक कार्य चांगल्या रीतीने करता यावे. आज देखील आपणापुढे हजारो

अडचणी आहेत पण त्या पैशाच्या अभावी तशाच राहून गेल्या आहेत. इमारत

फंडाच्या उत्पन्नातून जो निधी जमेल तो आपली गाऱ्हाणी दूर करण्याच्या

उपयोगी पडेल.

मी आपल्या समाजात जास्त शिकलेला आहे, म्हणून सरकारजवळ अधिकाऱ्याची

जागा मला मागता आली असती. मी अधिकारीही झालो असतो. पण

मग माझ्या अज्ञ बांधवांचे काय झाले असते ? मी अस्पृश्य समाजाकरिता माझ्या