डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३५२
स्वार्थाकडे व संसाराकडे नजर न ठेवता हे कार्य करीत आहे. ज्याला जितके
कार्य करता येईल तितके त्याने करावे. तसेच इमारत फंडास जितकी मदत .
करता येईल, तितकी आपण अवश्य द्यावी. मनुष्यमात्राला तीन ऋणे
असतात. एक आईबापाचे, दोन कुलदेवतेचे वतीन समाजाचे. ज्या समाजात
आपला जन्म झाला आहे, त्या समाजाचे उपकार आपण न विसरता फेडले
पाहिजेत. उपकार फेडण्याची संधी लुम्हाजवळ चालून आली आहे. तिचा
फायदा जरूर घ्या व इमारत फंडाला प्रत्येक स्त्री-पुरुषानी, १८ वर्षावरील बेकार
असला तरी, दोन दोन रुपये द्या.
तुम्ही जिल्हावार, तालुकावार व देशवार संघ स्थापन करून काम करीत असता,
हे मला मुळीच आवडत नाही. मी कोणताही भेदाभेद मानीत नाही. आगल्यात
भेदाभेद उत्पन्न झाल्यास हिंदू समाज त्याचा फायदा घेऊन आपल्या चळवळीचा
नाश करील. मला पुढारीपणाची मुळीच हाव नाही. पण आपणाला पुढारी
कशाला पाहिजे ? याचा आपण विचार करा. आपणाला पुढारी पाहिजे असेल,
तर तो शत्रुस तोंड देण्याकरिता आपल्या कल्याणाकरिता झटणारा, आपल्या
हिताच्या आड येणाऱ्या गांधी, नेहरू, वल्लभभाई पटेल यांच्याशी दोन हात
खेळणारा, असाच पुढारी आपणास हवा. तर मीही अशा माणसास पुढारी
म्हणावयास तयार आहे. (टाळया) वाटेल त्या दगडाला शेंदूर फासून मारुती
होता येत नाही. (हंशा) चाळीच्या पटांगणात तलवारीचे हात करणारा पण
रणांगणात गुलूगुलू करून पळत सुटणारा योद्धा काय कामाचा ?
पांडवांनी जन्मभर श्रीकृष्णाची सेवा केली. शेवटी स्वर्गाला नेण्याविषयी
श्रीकृष्णाला विनवू लागले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला ' मीच ओळ्या जगन्नाथला वाहात चाललो आहे .' अशाच प्रकारची स्थिती आपल्या चळवळीतून बाहेर आहेत त्यांची झाली नाही म्हणजे त्यांनी पुष्कळ मिळविले. आपल्या कार्यात कार्यकर्त्या मंडळीची उणीव आहे. ही उणीव शिक्षक वर्गाने भरून काढावी. इमारतीकरिता घेतलेली जागा अपुरी आहे असे आपले लोक म्हणत आहेत. अधिक जागा घ्या, आम्ही पैसे मिळवून देतो असे त्यांचे म्हणणे आहे. जास्त जागा घेण्याचा माझा विचार आहे, अर्थात आपल्याला ह्या कार्याकरिता एकंदर दोन-अडीच लाख रुपये खर्च येईल. त्याकरिता मी काही योजना तयार केल्या आहेत. ज्यांचा मासिक पगार ३० रु. किंवा अधिक असेल | त्यांनी आपला एक महिन्याचा पगार दिल्यास त्यांचे नाव इमारतीत बोर्डावर लिहिण्यात येईल.