२३-११-१९४० सार्वजनिक कार्यासाठी एकजूट हवी - Page 391

सार्वजनिक कार्यासाठी एकजूट हवी ३५३

मी खेडोपाडीही मागणी करणार आहे. पण खेडेगावात प्रत्येक माणसावर मागणी न करता, गावाची वर्गणी म्हणून त्या गावाचे नाव लिहिण्यात येईल. तेव्हा मित्रहो, आपला भावी काळ उज्ज्वल ठेवावयाचा असेल, तुमच्या समाजाचे कल्याण करावयाचे असेल, तर तुम्ही आपले कर्तव्य म्हणून हे कार्य पार पाडा. डॉक्टर बाबासाहेबांचे भाषण संपल्यावर डॉक्टर आंबेडकरांच्या जयजयकाराने वातावरण परत दुमदुमून गेले.

शेवटी बाबासाहेबांना पुष्पहार घालण्यात आला व सर्वाचे आभार मानल्यावर सभेचे काम संपविण्यात आले. तेथील व्यायाम शाळेला बाबासाहेबांनी भेट दिली. सभेची व्यवस्था आनंदा लालू मायणीकर. शं. ना. खैरमोडे, ठोकळे मास्तर, माने मास्तर, कांबळे वगैरे मंडळींनी फारच चांगली ठेविली होती. याच सभेत परगावचे श्री. सुकड्या सखाराम जाधव यांनी बाबासाहेबांचे दर्शन घेऊन एक रुपया इमारत फंडास दिला.