२३-११-१९४० सार्वजनिक कार्यासाठी एकजूट हवी - Page 392

१८३

आता पालवी फुटली आहे

ब क ~ दिसत आहे कै

उद्या फळे येण्याचा रंग ।दैसत आहे

श्री. सोमवंशीय समस्त मंडळ, चिंखलपाडा, फोरास रोड, मुंबई यांचेतर्फे इमारत फंडास निधी अर्पण समारंभ रविवार. ता २४ नोव्हेंबर १९४० रोजी। सायंकाळी ६ वाजता दलितांचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे| अध्यक्षतेखाली मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी बॅरिस्टर| माने, मोहिते मास्तर, श्री. मडक्रेबुवा, उपशाम मास्तर. सेक्रेटरी, इमारत फंड,| श्री. धयाळकर जी. ओ. सी. समता सैनिक दल, मुंबई श्री. मिढे पाटील वगैरे प्रमुख मंडळी हजर होती. लोकसमुदाय ४-५ हजारावर होता.| डॉ. बाबासाहेबांचे स्वागत जमलेल्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि|

डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, आंबेडकर कौन है, दलितोंका राजा|

हे ' वगैरे सुभाषितांनी केले. |

सभेस श्री. एन. एम. साळवे यांनी सुरुवात केली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आमच्या आमंत्रणास मान देऊन आपला बहुमोल वेळ खर्च करून या ठिकाणी आले| याबद्दल त्यांचे आभार मानिले. तसेच ते सभेचे नियोजित अध्यक्ष असल्यामुळे] त्यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. श्री. बी. एस. गायकवाड यांनी अनुमोदन दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब अध्यक्षस्थानी विराजमान झाले. |

इमारत फंडाचे सेक्रेटरी श्री. एस. ए. उपशाम मास्तर यांनी अत्यंत उद्बोधक असे भाषण केले.

तद्नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलावयास

उभे राहिले, ते म्हणाले, |

प्रिय भगिनींनो आणि बंधुजनहो, |

आजच्या सभेत इमारत फंडाकरिता जमा केलेली रक्कम स्वीकारून येथील मंडळींना आशीर्वाद देणे या पलीकडे काही बोलावे असे मला वाटत नाही. मला! जे काही बोलावयाचे होते ते मी कालच वरळीच्या सभेत सांगून टाकले| आहे. शिवाय माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जे काही बोलावयाचे होते ते सांगितले आहे. तेव्हा माझ्यापासून लांबलचक भाषणाची आपण अपेक्षा करू नये. या कार्यास नुकतीच सुरवात झालेली आहे व त्याचा ठसा जितका चांगला उमटवता येईल तितका उमटवणे प्राप्त आहे. अर्थात रात्रीच्या भाषणाचा गोषवारा मी