२३-११-१९४० सार्वजनिक कार्यासाठी एकजूट हवी - Page 393

आत्ता पालवी फुटली . . . . .. रंग दिसत आहे ३५५

सांगणार आहे. तसेच ज्यांना इमारत फंडाची कल्पना झालेली नसेल त्यांना ती करून देणे आवश्यक आहे. येथे जमलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाने विचार करावा की गेल्या वीस वर्षात आपली बरीच प्रगती झालेली आहे. तसेच ही प्रगती कायम

कशी राहील याचाही विचार करावा. गेल्या वीस वर्षात समाजाच्या प्रगतीची जबाबदारी माझ्या शिरावर होती, मी ती माझे [कर्तव्य ] [म्हणून ] [समजतो. ] पुष्कळ लोकांना माझे कार्य नापसंत वाटत असेल आणि म्हणून ते माझ्यावर [टीकाही ] करतात. सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यावर टीका ही [व्हावयाचीच. ] मी देखील दर आठवड्यास जनतेतून गांधींवर [टीका ] [करतो. ] अर्थात माझ्यावर काही माणसांना टीका करण्याचा अधिकार [आहेच. ] मात्र टीका करताना स्वत चे मन शुद्ध असावे, त्यात कसल्याही तऱ्हेचा कल्प [अगर ] [अढी ] [ठेवून ] [टीका ] [करू ] नये. मला सार्वजनिक कार्यात उपलब्ध [असलेल्या ] [साधनांचा ] [आणि ] [गांधींना ] उपलब्ध असलेल्या साधनांचा [तारतम्य ] [दृष्टीने ] [विचार ] [करावा. ] आपली सर्वांची वीस वर्षापूर्वीची स्थिती काय [होती ] [? ] [आता ] [कशी ] [आहे ] [? ] [या ] [सर्वांचा ] [विचार ]

केला तर माझ्या नावावर [केव्हाही ] [शून्य ] [पडणार ] [नाही. ]

माझ्याबरोबरीने कार्य करीत [असलेले ] [इतर ] [पक्ष ] [देखील ] [हिंदुस्थानात ]

आहेत. ब्राह्मणेतर पक्ष सन १८५० [पासून ] [कार्य ] [करीत ] [आहे. ] मराठ्यांचे राजे

देखील दोन दोन पैशानी [त्यांना ] [मदत ] [करीत ] [आहेत. ] त्यांच्या ' विजय मराठा [' ]

या वर्तमानपत्रास त्यांनी [तीस ] [हजारावर ] [मदत ] [केलेली ] [आहे. ] तर मला अवघे

अडीच हजार रुपये मदत [केलेली ] [आहे. ] यातच वीस वर्षेपर्यंत [हा ] [कारभार ] [मी ] चालविला आहे. पण ब्राह्मणेतर पक्षाचे काय [झाले ] [? ] [आज ] [व्हाइसरॉय ] [मुंबईस ]

आले तर शेकडो लोकांच्या [भेटी ] [घेतात. ] पण आमच्या भास्करराव [जाधवांचा ]

मागमूसही नाही, असो.

वीस वर्षापूर्वी मी [हे ] [सार्वजनिक ] [कार्याचे ] [झाड ] [लावले ] [आहे. ] त्याला आता

पालवी फुटली आहे. उद्या फळे येण्याचा [रंग ] [दिसत ] [आहे. ] - झाली ही प्रगती अखंड कशी राहील [याची ] [व्यवस्था ] [करणे ] [प्राप्त ] [आहे. ] आतापर्यंतचे कार्य [झाले ]

ते शुष्क, निर्फळ [झाले ] [असे ] [कोणीही ] [म्हणणार ] [नाही ] [आणि ] [जो ] [म्हणेल ] [तो ] [माझा ]

शत्रु असला पाहिजे. मी म्हणतो ते [सत्य ] [आहे. ] हे कार्य पायाशुद्ध

आहे. कोणापुढेही दात [विचकण्याचा ] [प्रसंग ] [न ] [येईल ] [अशी ] [व्यवस्था ] [करणे ]

आवश्यक आहे. |

पुष्कळ लोक [काँग्रेसमध्ये ] [जातात. ] काँग्रेसचे लोक [त्यांच्या ] [हातावर ]

पावली ठेवतील [तर ] [माझ्या ] [हातावर ] [बंदा ] [रुपया ] [ठेवतील ] [अशी ] [माझी ] [खात्री ]

| आहे. (टाळ्या)