३५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मुंबईतील काँग्रेसचे एक मोठे पुढारी श्रीयुत भुलाभाई देसाई मला म्हणतात, “तुम्ही सेवाग्रामला चला व गांधींशी बोला !' पण माझ्याच्याने हे शक्य होणार नाही,
मी लहानपणी पुराण वाचले आहे. त्यात दुसऱ्याचे अन्न खाणारा कधीही स्वतंत्र असू शकत नाही. भीष्म, द्रोण वगैरे लोकांना कौरवांची बाजू खोटी आहे हे माहीत. होते. गादीवर पांडवांचाच हक्क होता. लढाईत पांडवांनाच विजय मिळणार हेही त्यांना माहीत होते, तरी देखील ते कौरवांच्या बाजूने लढले. एकाने विचारले हे तुम्ही असे का केले ? भीष्माने सांगितले ' आम्ही त्यांचे अन्न (भात) खातो म्हणून. '
आमचे स्वातंत्र्य हिंदू लोकांची पायपिटी करून मिळणार नाही. त्यांच्याशी लांगूलचालन करून भागणार नाही. आमच्या वाडवडिलांनी ते सर्व काही करून पाहिले, त्यांनी त्यांच्यासमोर, हिंदूंसमोर, छत्री घेतली नाही, पायात जोडे घातले नाहीत वगैरे अनेक गोष्टी करून पाहिल्या, पण काय उपयोग झाला ? त्यांच्याशी सग्रामात दोन हात कंरून झगडाच करावयास पाहिजे, त्याशिवाय दुसरा मार्ग
नाही. (टाळ्या)
'मल्ला- त्यांचा. भात (अन्न) खायचा नाही. मला स्वतःला समाजाचा उद्धार करावयाचा आहे. एखादा गरीब मनुष्य आपल्या गोधडीस ठिगळ वगैरे लावून शरीर. कसेतरी झाकतो, त्याप्रमाणे मी आजपावेतो सामाजिक कार्य चालविले आहे. भिक्षा मागून स्वातंत्र्य मिळणार नाही, हे सांगितलेलेच ठीक या वीस वर्षात माझ्या हातून एकही चूक झाली नाही अशी माझी मनोदेवता मला सांगत आहे. कोणाही माणसाने माझ्याकडून अमुक एक चूक झाल्याने सामाजिंक नुकसान झाले आहे असे सिद्ध करून द्यावे. आतापर्यंतचे कार्य निराशजनक नाही. जे करावयाचे आहे ते आत्मबलानेच करावयाचे आहे. आपल्याला पैशाची आवश्यकता आहे. राजकारण पैशावाचून चालणार नाही. माणसाच्या संसारास पैशाची जरूरी असते. त्याचप्रमाणे सामाजिक: संसारात पैशाची त्याहीपेक्षा अधिक जरूरी असते. आपल्याजवळ पैसा नाही. कॉग्रेसमागे पैशाच्या थैल्या आहेत. त्यांना या कार्यास एक रुपया खर्च झाला तर आपणास निदान पावली तरी खर्च लागणारच. महाड आणि नाशिकचे सत्याग्रह आम्ही भिक्षा मागूनच पार पाडले आहेत, पण हे कोठवर चालणार ? घागरीस छिद्र असल्याने तीतून पाणी गळून जाणार हे खास. तेव्हा काही तरी कायमची व्यवस्था असावी, असे माझे मत आहे. इमारतीसाठी अंदाजे . दोन अडीच लाख रुपये खर्च येईल. त्याच इमारतीपासून दरवर्षाला पाच हजार रुपये भाडे मिळाले तर आपली स्थिती सुधारेल. आपण सर्व लोक तन-मन-धनाने या कार्यासाठी झटले पाहिजे. कोणी म्हणतील डॉ. साहेब बेकारांपासूनही पैसे मागतात, पण मला असे विचारावेसे वाटते की, मनुष्य आयुष्यभर बेकार असू .