आता पालवी फुटली . . . . . . रंग दिसत आहे ३५७
शकतो काय ? महिना दोन महिने बेकार असू शकेल, पण जन्मभर बेकार असू
शकणार नाही. बेकार असताना जीवनास अवश्य असणाऱ्या गोष्टी त्याला मिळतात. इतकेच नव्हे तर तो आपली तल्लफ देखील भागवितो. कोणाही
माणसास आपली दोन रुपये वर्गणी भरण्यास काहीही हरकत नाही.
. दुसरे असे की, आपल्यात श्रीमंत लोक नाहीत. ज्यांना पन्नास रुपये पगार
मिळतो अशांना श्रीमंत म्हणता येईल. दोन चार आणे मजुरी मिळणाऱ्या मजुरापेक्षा त्यांची स्थिती काहीशी बरी असे म्हणता येईल. तेव्हा अशा लोकांनी शिंगे मोडून वासरात शिरू नये. ज्याची जशी इभ्रत असते तितकीच त्याची जबाबदारी असते. माझ्यावर लोक टीका करतात. कारण मला विद्या आहे व सामाजिक कार्याची सर्व जबाबदारी माझ्या शिरावर आहे. दोन रुपये देऊन
स्वतःची किंमत करून घेऊ नये. |
तिसरे-असे की, ज्यांचा पगार तीस रुपये किंवा त्याहून जास्त आहे, अशांनी स्वतःचा पगार द्यावा, बहुतेक लोक आपले नाव इमारतीवर यावे अशी
अपेक्षा करितात. आपले नाव इमारतीवर यावे अशी इच्छा-असेल, तर एक
महिन्याचा पगार देणगी दाखल. देणे प्राप्त आहे. यापेक्षा जास्त सवलत. ती
कोणती पाहिजे ?
एखाद्या माणसास अंगात हुशारी असल्यामुळे काम मिळू शकते; पण
बहुतेक शिक्षक, शिक्षकिणी व कारकून वगैरे लोक समाजाच्या दुर्दैवाचा
फायदा घेतात. अशा लोकांनीच समाजाचा फायदा करण्यास पुढे आले
पाहीजे: सर्वांनी आपल्या वाट्याची. वर्गणी भरली पाहिजे. मला त्याचे
काय ? माझे नाव हिंदुस्थानच्या त्रिकोणात आहे. मी आज आहे उद्या
नाही. माझ्या कार्याचा इतिहास जर कोणी लिहिला तर तो बराच मोठा होईल
असे मला वाटते. पण माझ्या पश्चात तुमचे काय ? मी आहे तो पुष्कळसे
होईल. आज़ पावेतो पुष्कळ मजल मारली आहे. अजून दिल्ली बहोत
दूर--' अजून पुष्कळ मजल मारावयाची आहे. हा एक खांबी तंबू मी उभारला
आहे. त्यास चोहोकडून खुंट्या मारून मजबूत करणे आवश्यक आहे. तसे
न.केले तर उंचावर गेलेला पतंग कनी कापल्यानंतर जसा खाली येतो तशी तुमची
स्थिती होता कामा नये. माझ्यानंतरही तुमचा मार्ग फार दूर आहे. तो सुखकर
व्हावा म्हणून मी हे कार्य करीत आहे, तरी बंधु-भगिनींनो या कार्यास नेटाने सुरवात
करा, अशी सूचना करून मी माझे भाषण संपवितो.
शेवटी श्री. मडकेबुवा यांनी डॉ. बाबासाहेबांना हार अर्पण केल्यानंतर श्री. साळवे
मास्तर यांनी सर्वाचे आभार मानून फुलहार दिले. सभा बाबासाहेबांच्या
जयघोषात बरखास्त झाली.
o ७ ७