२४-११-१९४० आता पालवी फुटली आहे, उद्या फळे येण्याचा रंग दिसत आहे - Page 396

१८४

__ असा भेदभाव [कराल ] [तर ] [अधोगतीला ] [जाल ]

इमारत फंडाची जंगी जाहीर सभा चंदनवाडी. मुंबई येथे अस्पृश्यांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, तारीख ७ डिसेंबर १९४० रोजी रात्रौ साडे आठ वाजता भरली होती. सभास्थानी तीन-चार हजारांवर जनसमुदाय जमला होता. या उपस्थित झालेल्या जनसमुहाने डॉ. बाबासाहेबांचे स्वागत टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात आणि ' आंबेडकर कौन है दलितोंका राजा हे. आंबेडकर, झिंदाबाद, थोडे दिनमें भीमराज,' वगैरे सुभाषितांनी केले. सदर प्रसंगी श्री. मोहिते मास्तर, वि. का. उपशाम मास्तर, वडवलकर, मिंढे पाटील, लोखंडे, गायकवाड, आमदार भाई चित्रे आणि वराळेसाहेब वगैरे मंडळी हजर होती. सभेची व्यवस्था उत्तमप्रकारे ठेवलेली होती.

सभेस सुरवात श्री. उ. तु. जाधव मास्तर यांनी केली, त्यांनी सभेचे नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. नंतर श्री. खैरे यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी.

अध्यक्षस्थान स्वीकारले.

प्रथमतः श्री. सी. एन. मोहिते मास्तर यांनी डॉ. बाबासाहेबांनी प्रस्थापित केलेल्या इमारत फंडाविषयी आणि वयात आलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाने इमारत फंडास द्यावयाच्या देणगी विषयी खुलासेवार भाषण केले. श्री. वडवलकर आणि उपशाम मास्तर यांनीही समयोचित भाषणे केली.

नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बोलावयास उभे राहिले. ते आपल्या

भाषणात म्हणाले,

आज आपण याठिकाणी सभा करून मला निमंत्रण दिले, याबद्दल मी आपले आभार मानतो. वास्तविक मी कोणाचेही आभार मानिले नाही. तुमचेच आभार का मानतो ? कारण तुम्ही आज दहा-बारा वर्षेपावेतो सार्वजनिक कार्यात भाग घेतला नाही व मला शंका होती की, येथील लोक झोपी गेले की काय ? किंवाते करतात तरी काय ? वगैरे गोष्टींचा थांगपत्ताही नव्हता. आता आपण ही सभा घेऊन समाजकार्याविषयी आपली जिज्ञासा दाखवित आहात आणि म्हणून मी आपले आभार मानणे योग्य आहे. महाडच्या सत्याग्रहापासून काही मंडळीनी कोकणी लोकांचा बूट काढला. ज्या लोकांनी तो काढला त्यांची नावे येथे सांगण्याची जरुरी नाही. माझ्याप्रमाणे तुम्हालाही त्यांची नावे

जनता : १४ डिसेंबर, १९४०.