. ... „असा भेदभाव कराल तर अधोगतीला जाल ३५९ `
माहीत असतील. अशा लोकांपैकी: एखाद्या माणसाने. सार्वजनिक चळवळीत भाग. घेतला आहे, अशी माझी मनोदेवता मला साक्ष .देत नाही. . अशा लोकांपैकी काही मंडळीनी उघडपणे कोकणस्थ व देशस्थ भेद माजविला आहे. या भेदभावाने.समाजाचे कल्याण होणे तर दूरच राहिले पण नुकसान मात्र ताबडतोड झाल्याशिवाय राहणार नाही. हा भेदभाव उत्पन्न करणाऱ्या लोकांनी या दहा-बारा वर्षात काही समाजहिताची कार्ये केली असती तर मला आनंद झाला असता: त्यांनी काही बोर्डिगे काढली असती; कांही गरीब मुलांना स्कॉलरशिपा देवविल्या असत्या तरीही मला आनंद झाला असता. पण तसे-काही एक नसून उलट समाजात. भेदनीती निर्माण करण्यात येत आहे. कदू शब्द सांगणे मला
प्राप्त होत आहे. येथे.जमलेल्या मंडळीना मला एक शुभसंदेश सांगावासा वाढतो
आणि तो हा की, तुम्ही देशस्थ, कोकणस्थ, कर्नाटकी वा. वायदेशी असा भेदभाव
कराल तर तुम्ही अधोगतीला गेल्यावाचून राहणार नाही. . इतके दिवस आपली
अधोगती झाली, ती आता होऊ देता कामा नये. समाजात भेदभाव करणाऱ्यांना
आपण बिलकूल थारा देऊ नका. त्यांच्याकरता मला कडक उपाय योजावे
लागतील. तुम्ही हे ओळखूनच की काय, आंपंसातील भेदभाव विसरून ही अपूर्व
संभा घडवून आणली म्हणून मी आपले आभार मानणे योग्य आहे. बरे असो.
` बंधुजनहो ! इमारतीच्या बाबतीत माझ्या अगोदरच्या दोन वक्त्यांनी आपणास
सांगितले आहे. यापूर्वीही मी इंमारतीच्या बाबतीत दोन' तीन ठिकाणी भाषणे
केली आहेत. आपण ' जनता ' वाचत असाल तर आपणालाही ते समजले
असेल... माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जे सांगितले त्यावरून त्यांना माझे मनोगत
समजले. नाही, असे वाटते. : ... ह "1३ [
इमारतीची कल्पना येणे. आवश्यक आहे. ही इमारत देशावर जशी चावडी
असते तशी करावयाची ,नाही. -दशावरच्या चावडीत कामधंदा न करणारे
रिकामटेकडे महार लोक लोळत असतात. अशा प्रकारची इमारत करण्याचा
माझा इरादा नाही. मुंबईत दगडचाळीमध्ये एक शंकराचे देऊळ होते. तेथे
बरेचसे साधुलोक . गांजा, चरस वगैरे ओढून मठात गप्पागोष्टी ` सांगत
बसत. याठिकाणी हिंदू-मुसँलंमान राहात असत. - ते एकमेकांच्या विश्वासातले
होते. "एकेदिवशी देवळातील शंकराची पिंडी कोणीतरी फोडली.. . तेव्हा ही
शंकराची पिंडी - मुसलमानांनी फोडली . असावी. असे वाटणे: साहाजिकच
होते. पण चौकशीअंती - असे समजले की, ती देवळातील ..-साधुंनी
फोडली. . मुसलमानांनी फोडली नाही. बंधुंनो ! मला जी इमारत करावयाची
आहे ती बेकार महारांना दिवसारात्री झोपण्यासाठी नव्हे, इमारती विषयीचा हेतू
निराळा आहे.