आणि भाषणे डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन ३६०
घेणे भाग आहे. आपण तो जाणणे म्हणजे दुसऱ्या एका विषयाकडे वळण
पैसा नाही, अस्पृश्य दारिक्र्याच्या गर्तेत सापडलो आहोत. आपल्याजवळ कोपर मोडल्याखेरीज भाकर मिळत नाही पण आपणाजवळ संघटनेचे सामर्थ्य फार दांडगे आहे. त्याच्यावरच आपल्याला प्रतिपक्षाशी दोन हात खेळावे
लागणार आहेत.
आपल्याला जे काही राजकीय हकक मिळालेले आहेत ते आपल्यापासून हिरावून घेण्यासाठी काँग्रेसही तयार आहे. काँग्रेसने मोठमोठ्या लोकांना | हतबल करून टाकलेले आहे. एकेकाळी ब्राह्मणेतर पक्ष अगदी बलाढ्य असा | होता. त्याचा सत्यशोधक समाज मोठ्या जोराने काम करीत होता. गणपतीच्या उत्सवाचे वेळेस ब्राह्मणाचा गणपती निराळा तर मराठ्यांचा गणपती | निराळा. त्यावेळेस ह्या मराठे लोकांनी ब्राह्मणांना चिडवण्यासाठी एक पालुपद तयार केले होते. ते ब्राह्मणांना ' हरर बॅ ' असे म्हणत असत. परंतु. जे ब्राह्मणेतर ब्राह्मणांना शिव्या देत असत त्यांची काय धडगत
आहे. ? रा. ब. बोले यांनी आपले आयुष्य ब्राह्मणांना शिव्या देण्यात
घालविले. परंतु तेच बोले आता बॅ. सावरकरांच्या ताटाखालचे मांजर झाले आहे. तीच गोष्ट पुण्याच्या जेधेची. ते आता पुण्यातील एका ब्राह्मणाच्या
हातातील बाहुले झालेले आहेत.
हा ब्राह्मणेतर पक्ष एवढा बलाढ्य होता पण तोच काँग्रेसपुढे लोटांगण घालीत का गेला? त्याचे कारण एकच आणि ते म्हणजे हे की त्यांच्यामध्ये |
विस्कळीतपणा आहे. आमची गत तशी नाही. आम्हाला जे काही मिळालेले
आहे त्याचा फायदा आम्ही आमच्या जातीकरिता करीत आहोत आणि तेही कोणाचे गुलाम न होता. |
हल्लीचे राजकारण फुकटचे नसते. गांधींनी काँग्रेसचे राजकारण लढविण्यास एक कोटी रुपये खर्च केले आहेत. मागच्या इलेक्शनमध्ये
मला हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने अगदी पराकाष्ठा केली. इतर लोक जरी निवडून आले तरी ते काँग्रेसला चालले असते पण मला निवडून येऊ द्यावयाचे नाही, अशी काँग्रेसची महत्त्वाकांक्षा होती आणि म्हणून वल्लभभाई पटेल यांनी त्याकरिता ३५,००० रुपये खर्च केले. परंतु आपल्या समाजाच्या एकीमुळे
मी दुसऱ्या नंबराने निवडून आलो. पारशांच्या बायांनी डॉ. गिल्डर यांनाच सॉलीड मते दिली नसती तर मी पहिल्या नंबराने पण निवडून आलो