. . असा भेदभाव कराल तर अधोगतीला जाल ३६१
असतो. म्हणून वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकी लढविण्यासाठी पैसा नसल्यामुळे आपली कुचंबणा होण्याचा संभव आहे. तसे होऊ नये म्हणून या
र आपल्याला प्रत्येक वर्षाला ५-६ हजार रुपये भाडे येऊ
शकेल. त्यामुळे आपण आपल्या निवडणुकी स्वतंत्रपणे लढवू शकू. त्याचप्रमाणे आपल्याला समाजातील लोकांना स्पृश्य लोकांपासून
गावोगावी त्रास होत असतो. मला अशा गोष्टी बऱ्याच सांगण्यात येत
असतात. परंतु मी काय करणार ? त्याच्याकरिता पैशाची आवश्यकता असते. वकील लोक पैशाशिवाय कसे काम करू शकतील ? म्हणून मला
लोकांना मोठ्या पराकाष्ठेने सांगावे लागते की, बाबांनो, तुमच्यासाठी मी जास्त
काही करू शकत नाही. ही गोष्ट खरोखरच नामुष्कीची आहे. म्हणून या इमारतीच्या उत्पन्नातून आपल्याला आपल्या लोकांची थोडीफार तरी दुःखे निवारण करता येतील.
या इमारत फंडाला पैसा देण्यासाठी आपणाजवळ श्रीमंत माणसे नाहीत. म्हणून थेंब थेंब रांजणामध्ये टाकीत राहिल्याने ज्याप्रमाणे रांजण भरतो त्याचप्रमाणे आपण सर्वानी थोडे थोडे पैसे देऊन हा इमारत फंड पुरा
केला पाहिजे.
हा प्रश्न माझ्या अगर दुसऱ्या कोणाच्याही स्वार्थाचा नाही. ही इमारत म्हणजे सर्व लोकांची पुंजी आहे, अशी आस्था मनात बाळगून आपण सर्वानी मदत केली पाहिजे. ज्या लोकांना २५ रुपयांपर्यंत पगार आहे त्यांच्यासाठी मी दोन रुपये वर्गणी ठेवलेली आहे. परंतु ज्या लोकांना जास्त पगार आहे त्यांनी मात्र शिंगे मोडून वासरात शिरण्याचा प्रयत्न करू नये. त्या सर्वांनी एक महिन्याचा पगार या कार्यासाठी हस्त्या हप्त्याने दिला पाहिजे. तुम्ही जन्मभर पैसे कमवून आपल्या नातलगांना पोसाल, सावकारांचे पैसे भराल, दागिनेही कराल तरीपण हे सामाजिक ऋण आपण द्यावयास पाहिजे. या कामामध्ये तुम्ही हलगर्जी करता कामा नये. मी आपणास सरळपणे विनंती करतो. तिचा जर काही उपयोग झाला नाही तर कडक उपायांचा देखील उपयोग करण्यास मी मागे पुढे पाहाणार नाही, तो उपाय कोणता तर जाती बहिष्कार. वाईट काम करणाऱ्या माणसास ज्याप्रमाणे आपण वाळीत टाकतो त्याप्रमाणे या कार्याला मदत न करणाऱ्यास वाळीत टाकले तर वावगे होईल, असे मला वाटत नाही. इतके सांगून आपण या कार्यास मदत करा, असे परत एकदा सांगून माझे भाषण संपवितो.
७ ० ७