१८९
मुलांना शिक्षण देण्यात कसूर करू नका
शनिवार, तारीख १५ फेब्रुवारी १९४१ रोजी रात्रौ १० वाजता फलटणरोड
येथील म्युनिसीपल चाळीमध्ये प्रि. दोंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली जंगी
सभा झाली. सभेत अलोट जनसमूह हजर होता. अस्पृश्यांचे | नेते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभेस हजर राहणार म्हणून फोर्ट भागात व इतर
ठिकाणी राहाणाऱ्या लोकांचे थवेच्याथवे ८ वाजल्यापासून सभेच्या ठिकाणी येत
होते. डॉ. बाबासाहेब इतर कार्यकर्त्यांसह सुमारे १० वाजता सभास्थानी येते झाले. त्यावेळी जयघोषाच्या निनादानी सर्व वातावरण दुमदुमून गेले होते.
नंतर थोड्या वेळाने सभेस सुरवात झाली. सभेचे नियोजित अध्यक्ष प्रि. दोंदे यांनी अध्यक्षस्थान स्विकारल्यानंतर भाषण केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना २३० रुपयांची थेली अर्पण केली. नंतर डॉ. बाबासाहेब भाषण करावयास उभे राहिले, ते आपल्या भाषणात म्हणाले,
सभाधिपती, भगिनींनो व बंधुंनो,
बऱ्याच वर्षानंतर आज मी याठिकाणी आलेलो आहे. लहानपणी मी ज्यावेळेस एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये जात होतो त्यावेळेस याचठिकाणी माझे काही नातलग राहत होते. त्यांचे मला जेवण्याचे आमंत्रण होते म्हणून मी आलो होतो. त्या दिवसापासून नाही. तो फक्त आजच मी येथे येत आहे.
एकंदरीत आजपर्यंत जे समाजकार्य होत आले आहे त्याचा वारा येथपर्यंत वाहात आला असेल असे मला वाटत नव्हते. त्याचे कारण असे की याठिकाणी अजून कसलीही चांगली सभा झालेली आहे, असे माझ्या ऐकिवात नव्हते तथापि, आज येथील लोकांनी ही सभा घडवून आणली त्याबद्दल मला समाधान वाटत आहे | |
मी दुसरी सगळी कामे बाजूला ठेवून हे इमारतीचे काम हाती घेतले आहे.. या इमारतीची आपल्याला किती जरूरी आहे, याची तुम्हाला चांगली कल्पना असेल, असे मला वाटत नाही. तुम्हापैकी प्रत्येकाला माहीत असेल की आपल्या समाजाची कारकीर्द महाड सत्याग्रहापासून सुरू झाली. तुम्ही कुलाबा आणि
जनता : २२ फेब्रुवारी १९४१.