या जागा मानाच्या नसून मार्याच्या आहेत ३
येथे श्री. किसनराव शिवराम गांगुर्डे यांनी चहापार्टी दिली. सदर प्रसंगी आंबेवणी येथील महार मंडळीतर्फे व भगिनी मंडळातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आले. तेथून वाजंत्र्यांच्या व जयजयकारांच्या जयघोषात मिरवणूक वरखेडा येथे आली. श्री. शिवराव दादाजी गांगुर्डे यांचे घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्याबरोबर मंडळीस मेजवानी देण्यात आली. या सभेस अत्यंत मार्मिक असे त्यांनी अर्धा पाऊण तास भाषण केले. सभेसाठी जमलेल्या सर्व मंडळीस वरखेडकर समस्त मंडळीने सभेनंतर सुग्रास भोजन दिले. तेथून पुढे जाताना वाटेत जऊळके येथे पुष्पहार अर्पण करण्यात आला. पिंपळगाव बसवंत येथील चावडीसमोरील पटांगणात श्री. भाऊराव गायकवाड यांच्या उमेदवारीस पाठिंबा देणारे छोटेसे भाषण डॉ. बाबासाहेबांनी केले. तेथील मंडळीनी डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून फलाहारही दिला. ओझर, [तांबट ] येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक गावच्या मुख्य-मुख्य रस्त्यांनी काढण्यात आली. मिरवणुकीत सुस्वर वाद्ये वाजत होती व जयजयकार चालला होता. महारवाड्यात जमलेल्या मंडळीपुढे थोडे भाषण करून श्री. गायकवाड यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिला. तेथून पुढे खेरवाडी, [चांदोरी, ] सायखेडा, चाटोरी, नायगाव वगैरे ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात [आले. ] रात्रौ ८.३० वाजता सिन्नर येथील मुख्य-मुख्य रस्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मोटारमधून प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. [रात्रौ ] [९.३० ] [वा. ] सभेच्या कामास सुरुवात होऊन, सुरुवातीस श्री. दौलतराव जाधव, [पुंजाजी ] नवसाजी जाधव व रघुनाथराव रिपोटे यांची श्री. भाऊराव गायकवाड [यांच्या ] उमेदवारीस पाठिंबा देणारी भाषणे झाली. शेवटी डॉ. बाबासाहेब टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलावयास उभे राहिले. आगामी निवडणूक [किती ] [महत्त्वाची ] आहे व आपण किती दक्षतेने वागावयास हवे यांचे स्पष्टीकरण [करून ] [आपल्या ] जिल्ह्यातर्फे आपण श्री. भाऊराव गायकवाड [यांनाच ] [निवणून ] [देणे ] [अगत्याचे ] आहे, असे सांगितले. नंतर सिन्नर तालुका [संघाचे ] [अध्यक्ष, ] [श्री. ] [बापूराव ] भालेराव यांचेकडे सिन्नर येथे डॉ. बाबासाहेबांना व स्काऊट मंडळास मेजवानी झाली. तेथून नाशिक स्टेशनवर येत असता वाटेत [शिंदे ] [येथील ] [मराठे ] [मंडळीने ] व महार मंडळीने डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण [केले. ] तसेच [पळसे ] [येथील ] ` महार मंडळीने पुष्पहार अर्पण केला.
याप्रमाणे अखिल भारतीय अस्पृश्य मानलेल्या समाजाचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंडळाच्या निवडणुकीबाबत नाशिक जिल्ह्यातून