मुलांना शिक्षण देण्यात कसूर करू नका ३६३
रत्नागिरी जिल्ह्यातील राहणारे असल्यामुळे तुम्हाला महाडाविषयी माहिती असणे
शक्य आहे. या महाडच्या सत्याग्रहाचा माझ्या मनावर फार मोठा परिणाम
झालेला आहे. त्या सत्याग्रहापासून मी जर काय शिकलो असेल तर ते हे की,
आपण आपल्या उन्नतीचे काम करावयास लागलो तर स्पृश्य लोक आपल्याला
भयंकर त्रास देतात. महाडच्या ठिकाणी आपले लोक जेवावयास बसले
असताना स्पृश्य लोकांनी त्यांना मारिले. मी त्यावेळेस डाक बंगल्याकडे असताना मला या स्पृश्य लोकांनी गराडा घातला. परंतु तेथे पोलीस असल्यामुळे
त्यांना मला काही करता आले नाही.
|
` ज्यावेळेस सत्याग्रहास आलेले लोक आपआपल्या गावी परत गेले त्यावेळेस बऱ्याच खेड्यातून स्पृश्य लोकांनी आपल्या पुरुषांना तर मारलेच पण आपल्या
स्त्रियांनादेखील भाल्याने मारहाण करण्यास मागेपुढे पाहिले नाही. इतकेच
नसून बऱ्याच स्पृश्य लोकांनी आपल्या लोकांनी लाविलेल्या जमिनीदेखील काढून
घेतल्या आणि बराच जाच केला. हा. जाच कुलाबा जिल्ह्यातील आपल्या
लोकांनी १-२ वर्षे काढला. परंतु खेदाची गोष्ट अशी की आम्ही मुंबईत राहणारे
लोक त्यांच्याकरिता काहीही करू शकलो नाही. ह्याचे कारण काय £ त्याचे
कारण दुसरे तिसरे काही नसून त्या लोकांची दुःखे निवारण करण्यासाठी
आपल्याजवळ पैसा नव्हता आणि याच कारणामुळे माझ्या मनावर असा परिणाम
झालेला आहे की आपल्याला आपला सामाजिक लढा लढविण्यासाठी
आपणाजवळ पैसा असणे अत्यावश्यक आहे. तो पैसा आपणाला या
इमारतीपासून मिळेल, असे वाटते. |
आतापर्यंत आपले बरेचशे सामाजिक काम झालेले आहे आणि होत
आहे. परंतु जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत हे ठीक आहे. परंतु माझ्यानंतर
काय ? आपल्यामध्ये अजूनपर्यंत व्हावी तितकी सुधारणा झालेली
नाही. आपल्याला पुढे आपला लढा लढविणे क्रमप्राप्त आहे. त्याकरिता ही
इमारत झाल्यावर माझ्यानंतरच्या लोकांना सोयीस्कर होईल यात संशय
नाही. त्यांच्याकरिता मी जर एखादी योजना करून ठेवली नाही तर ते मला
दोष दिल्याशिवाय राहणार नाहीत.
ही इमारत झाल्यावर तिच्यापासून सालीना पाच-सहा हजार रुपये उत्पन्न
येईल, असा माझा अंदाज आहे. या उत्पन्नाचा विनियोग आपल्या लोकांना स्पृश्य
लोकांकडून होणाऱ्या त्रासाचे हरण करण्यासाठी करण्यात येईल.