आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३६४
इमारत किंवा एखादी चाळ ज्याप्रमाणे एखादा शेठ आपल्या मुलाच्यासाठी
माझा हेतू आहे. माझ्यानंतर ह्या बांधून ठेवतो त्याचप्रमाणे ही इमारत बांधण्यात
राहिले इमारतीपासून तुम्हाला फारच मदत होईल. परंतु तुम्ही सर्वांनी एकोप्याने पाहिजे. म्हणून सर्वांनी या कामाकरिता मदत करणे अत्यावश्यक आहे. .
याप्रसंगी मला आपणास तीन गोष्टी सांगाव्याश्या वाटतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ही की तुम्ही जो हा कचरापट्टीचा धंदा करिता तो काही इतका मानाचा नाही. तो अत्यंत गलिच्छ असा आहे. आपले लोक पूर्वी पलटणीत होते, हल्ली नाहीत. त्याचे कारण काय ? त्याचे कारण आपले लोक हा धंदा करतात हेच आहे. हल्ली ब्रिटिश सरकारला माणसांची फार जरुरी असताना देखील आपल्याला पलटणीमध्ये घेत नाहीत. पलटणीमध्ये स्पृश्य लोकांचा जास्त भरणा असल्यामुळे ब्रिटिश सरकार आपल्यापेक्षा याबाबतीत त्यांची जास्त पर्वा करीत
आहे. म्हणून तुमच्या मुलांना तुमच्यानंतर तुमच्यासारखाच धंदा करण्याची पाळी येऊ नये, म्हणून तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावयास पाहिजे. मुलांना शिक्षण दिले पाहिजे, तुमची मुले क्लर्क, शिक्षक वगैरे झाले पाहिजेत अशी तुम्ही इच्छा धरली पाहिजे. इतर जिल्ह्याचे मानाने जर पाहिले तर कुलाबा, रत्नागिरी या जिल्ह्यात आपले लोक शिक्षणाच्या बाबतीत फार मागासले आहेत. तुमच्यात फार थोडे
मॅट्रिक झालेले आहेत. याकरिता तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण देण्यास कसूर
करता कामा नये. ही
दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला कपडे वापरण्याच्या बाबतीत फार वाईट सवय
लागलेली आहे. तुम्ही कामावर जाताना, फिरावयास जाताना किंवा लग्नाला
जाताना एकच कपडा घालीत असता. हे फार वाईट आहे. कामावर
जाण्याकरिता वेगळे व फिरावयास जाण्याकरिता किंवा लग्नकार्यात जाण्याकरिता
चांगले कपडे करा. दोन वेळचे खावयास नसले तरी चालेल परंतु चांगले कपडे करा. कारण कपड्यापासून आज जगात मान आहे. |
तिसरी गोष्ट अशी की मुंबईत म्युनिसीपल कामगार युनियन फार जोरात आहे. मागे एकदा मडकेबुवांनी ही युनियन काढण्याचा घाट घातलेला होता. त्यावेळेस त्यांना यश आले नव्हते. परंतु आता त्यांच्या प्रयत्नाला यश आलेले आहे. म्हणूनच मी तुमचे व मडकेबुवांचे अभिनंदन करतो. संघटनेचे किती महत्त्व आहे, याचे तुम्हास एक ताजे उदाहरण देतो. म्युनिसीपालिटी कामगार युनियनतर्फे ड्रेनेज डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांना कामाच्या मानाने फार थोडा पगार मिळत असे. त्यांना जास्त पगार मिळावा