मी म्हणतो अस्पृश्य गव्हर्नर का नसावा ? ३६७
.. ते आपल्या भाषणात म्हणाले,
बंधु. भगिनींनो,
` आपणापैकी कोणी निजामाच्या संस्थानातून आला आहात तर कोणी खालसा
भागातून आला आहात. म्हणून मला आज माझ्या भाषणाचे दोन भाग करावे
लागतील. . एक खालसातील बांधवांसाठी व दुसरा निजाम प्रांतीय
बांधवांसाठी. सोलापूर जिल्ह्यातील बांधवांना आमदार ऐदाळे यांनी बरीच
सरकारी पडित जमीन मिळवून दिली आहे. त्यांची दैन्यावस्था शक्य तितकी
कमी करण्यासाठी आणि काही गावच्या अस्पृश्यांवर झालेले अन्याय निवारण्यासाठी
त्यांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत व त्यात त्यांना यशही आलेले आहे. पुढेही
काही सुधारणा होणार तोच राज्यकारभाराचा गाडा मधेच रस्त्यावर टाकून
काँग्रेसचे बुजके बैल रानोरान पळाले ! हे बैल गांधींना बुजतात ! गांधींनी
कसलीतरी हूल उठवावी आणि त्यांच्या भाटांनी डोळे झाकून टिमकी वाजवावी,
अशी आज काँग्रेसची स्थिती आहे. हिंदी लोकांचा कैवार घेऊन त्यांच्या हिताचे
रक्षण करण्यासाठी काँग्रेस १८८५ साली जन्माला आली. सुरवातीच्या पाच
पंचवीस वर्षात ती कोणाच्या फारशी ओळखीची नव्हती. मुंबई-पुण्याच्या
"कोणीतरी पुढाऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी उठावे, कुठेतरी जमावे आणि काही ठराव करावे,
अशी तिची कामगिरी होती ! पण गेल्या वीस वर्षापासून तिच्या नावाचा डांगोरा
जोराने पिटण्यात येऊ लागला आहे. जरी इंग्रज लोक मि. चेंबरलेन यांना
-ब्रधानपद देतात, साम्राज्याची सर्व संत्रे त्यांच्या हाती देतात पण त्यांच्या सार्वजनिक
वागणुकीमुळे आपणाला गुलामगिरीच्या खोड्यात पडावे लागेल अशी शंका येताच
त्यांना प्रधान पदावरून खाली ओढतात ! अशी स्थिती काँग्रेसची नाही. तिला
व्यवहार ज्ञान नाही. १९४० साल म्हणजे १९११ साल, असा तिला भ्रम झाला
आहे. पण तिच्यात आता दम राहिला नाही. काँग्रेसच्या गंगेतून फुटून ` हिंदूसभेची यमुना निराळ्या प्रवाहाने वाहू लागली आहे. मुसलमान मुस्लिम
_ल्लीगचे झेंड्याखाली आहेत. मुस्लिम लीगचा प्रवाह निराळ्याच मार्गाने वाहात
आहे. मुसलमानांचा दरारा वाढला आहे. इंग्रज सरकारला शरण आणण्याची
ताकद काँग्रेसमध्ये किंवा हिंदू सभेमध्ये नाही. ती फक्त एकट्या मुस्लिम
ल्लीगमध्येच आहे. हिंदुस्थानचे व्हाईसरॉय लॉर्ड लीनलिथगो यांनी कायदे
-कौन्सिलाच्या पुनर्घटनेची योजना पुढे मांडली. तेथे दुराग्रहाने सगळी सत्ता
काँग्रेसच्या हाती द्या आणि मग मुस्लिम लीगच्या लोकांना किंवा अस्पृश्यांना अथवा
` अल्पसंख्यांकांना त्यात घ्यावयाचे किंवा नाही व घेतले तर किती प्रमाणात आणि
| कोणत्या. व्यक्तिला घ्यावयाचे ते काँग्रेस ठरवील अशी अहंकाराची आणि
` उद्दामपणाची भूमिका काँग्रेसने घेतली. व्यक्तिमात्राने अहंकार केला तर त्याची