३६८ डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
चिता करण्याचे काहीच कारण नाही. त्यांचे कर्म तो भोगील. पण जेव्हा
स्थानामुळे वाधक होतो तेव्हा व्यक्तिचा अहंकार त्या व्यक्तिला प्राप्त झालेल्या
सर्वांनीच त्याचा विचार करावयास पाहिजे व राष्ट्राच्या हितासाठी खोट्या, दांभिक व अहंकारी वृत्तीला आळा घातला पाहिजे आणि राष्ट्रकार्याचा गाडा योग्य त्या मार्गाने नेला पाहिजे. पण गांधींच्या बुजर बैलांनी तो रस्त्यावरच टाकून हिंदी राजकारणाचा विचका केला आहे. गांधींच्या तंत्राने चाललेल्या हरिजन सेवक संघाचीही तीच रडकथा ! ते अस्पृश्यांना साक्षर करण्यासाठी कुठे एखादी रोडकी शाळा काढतील आणि वापरण्यासाठी वेगळी विहीर बांधतील, पण ती जबाबदारी सरकार यथाशक्ती पार पाडीतच आहे. हरिजन सेवक संघवाल्यांना मी सूचना करतो की, बाबांनो, अस्पृश्यांना पाणी पाजावयाचे असेल तर समतेने पाजा. आम्हाला विषमता नष्ट करावयाची आहे. अशा थातुर मातुर उपायांनी ती नष्ट होणार नाही. शरीराच्या नाजूक भागावर उठलेला ढळढळीत फोड नाहीसा करण्यासाठी तेल पाणी लावून नवारीचा हात फिरविल्याने काम भागेल. का ? हरिजन सेवक संघ, काँग्रेस आणि गांधी हे मुसलमानांची मनधरणी. करतील, राजेरजवाड्यांची मनधरणी करतील पण अस्पृश्यांच्या बाबतीत ? अंहं ! गांधींना हिंदू गव्हर्नर पाहिजे, हिंदू कलेक्टर पाहिजे. मी म्हणतो अस्पृश्य. गव्हर्नर का नसावा ? अस्पृश्य कलेक्टर का नसावा ? पण गांधींना नेमके तेच नको ! मध्यप्रांतात डॉ. खऱ्यांनी एका अस्पृश्याला दिवाणाची जागा देताच गांधींचे पित्त भडकले ! ते डॉ. खऱ्यांवर चवताळले. योग्यवेळी तो पन्र-व्यवहार मी उघडकीस आणणार आहे ! थोडक्यात सांगावयाचे म्हणजे गांधींची चळवळ,
त्यांचा सार्वजनिक संसार अस्पृश्यांच्या बाबतीत असा हा पक्षपातीपणाचा
आहे. संसाराला मीठ, मिरची, लाकूडसुद्धा लागते. गांधींच्या या संसाराला शेठ सावकारांकडून चंदी मिळते. काँग्रेसचा आज जो बोलबाला ऐकू येतो त्यात गांधींची कर्तबगारी नाही ! ती एक फोटी रुपयांच्या फंडाची करामत्त आहे. बंधुनो, आपला संसार आपणच केला पाहिजे. पण त्याला सामग्री नाही, फंड नाही, पैसा नाही. म्हणून हताश होऊन बसल्याने सध्याच्या धकाधकीच्या मामल्यात आपला निभाव लागणार नाही. आपल्याला तर मानाने जगावयाचे आहे. तसे जगण्यासाठी राजकीय हक्काची सत्ता आपल्या हाती पाहिजे. महारकीचा लोभ आणखी किती दिवस कवटाळून धरावयाचा ? मीही आठ आण्याचा वतनदार आहे. वतनदारीचा लोभ मी सोडला. अजूनही माझ्या घराच्या आढ्याला बांधलेले देव स्पृश्य गावकरी लग्नकार्याच्या वेळी मोठ्या मिरवणुकीने नेतात. एकदा त्या गोष्टीला खंड पडला आणि गावात वाखा झाला. आपल्या सार्वजनिक कार्याचा तसा वाखा होऊ देऊ नका. आपल्या