मी म्हणतो अरपृश्य गव्हर्नर का नसावा ? ३६९
चळवळीचे कार्य अखंड चालावे म्हणून मुंबईत मी अडीच लाखाची इमारत
बांधण्याचे ठरविले. तिच्या काही भागात ' जनता ' पत्राचे ऑफिस, प्रेस वगैरे ठेवून बाकीच्या भागातून भाडे घेता येईल. वर्षाकाठी आठ नऊ हजाराचे उत्पन्न
येईल व त्यातून आपला खर्च भागेल. त्यासाठी देशावरच्या अस्पृश्य
लोकांकडून, प्रत्येक घराकडून एक रुपया तरी मिळवा. हे पैसे घेण्यासाठी या जिल्ह्यात मी दोनच माणसे निवडली आहेत. एक आमदार ऐदाळे व दुसरे हरिभाऊ तोरणे. याजकडे पैसे द्यावेत. हा पैसा आपला आपणच जमविला पाहिजे. दुसऱ्याकडून पैसा घेतला तर आपण त्यांचे होऊ. महाभारतातील कौरव पांडवांची कथा तुम्हाला माहीत असेलच. पांडवांच्या बाजूला न्याय आहे, त्यांच्याच बाजूला सत्य आहे याची पूर्ण खात्री असून भीष्म, द्रोणासारखे योद्धे कौरवांच्या बाजूला राहिले कारण, त्यांनी कौरवांचे अन्न खाल्ले होते. आपण आपल्या शक्तीनुसार मदत करा. मी इमारत बांधून काढीन असा मला आत्मविश्वास आहे.
आज निजाम सरकारच्या राज्यातील बांधवांसंबंधाने बोलावयाचे. खरे पाहिले तर खालसा मुलुखात काय आणि निजाम हद्दीत काय, महारांची स्थिती जवळ जवळ सारखीच. हिंदुस्थानात जी पाच सहाशे संस्थाने आहेत त्यात निजामचे राज्य पहिल्या दर्जाचे आहे. त्यामानाने बडोदा स्टेट किती लहान? पण त्या संस्थानाने अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे. म्हैसूर संस्थानामध्ये तसेच तिकडे अस्पृश्यांना जमीनी मिळाल्या. सुरतीच्या साऱ्याची सूटही मिळाली. त्या संस्थानातून अस्पृश्यांच्या हितसंबंधांकडे सरकारने लक्ष दिल्याचे दिसून येते. तसे हैद्राबाद संस्थानात काय आहे? वतनदार महारांच्या पोटापाण्याचा प्रश्न समाधानकारकपणे अजून सुटलेला नाही. अस्पृश्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सोय नाही. लाखो एकर सरकारी जमीन पडली असून अस्पृश्य लोक [उपास ] काढीत आहेत. संस्थानाची आर्थिक स्थिती चांगली असताना असे का व्हावे? मला समजत नाही. आपली दु:खे सरकारच्या नजरेस आणण्यासाठी अस्पृश्यांनी संघटना करावी. हैद्राबादच्या नवीन होणाऱ्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य [ते ] [प्रतिनिधित्व ] [मिळवण्याचा ] [प्रयत्न ] करावा. आज जे काही पैसे निजाम प्रांतीय [अस्पृश्यांनी ] [मला ] [देण्यासाठी ] [आणले ] होते ते त्यांना त्यांच्या कार्याला पाहिजे [असतील ] [तर ] [घेऊन ] [जावेत. ] आपली गाऱ्हाणी योग्य त्या सनदशीर [मार्गाने ] [सरकारच्या ] [नजरेस ] [आणण्याचा ] [प्रयत्न ] करावा. त्यात जरुर त्या प्रसंगी [मी ] [साह्य ] [करू ] [शकेन. ]