३७० डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
ठराव पास झाले. डॉ. आंबेडकर यांचे भाषण झाल्यावर पुढील तीन
वतनदार महार, मांग लोकांना ठराव १ ला.-- निजाम सरकारच्या हद्दीतील
मोबदला करावी लागणारी कामे लक्षात घेता त्यांना सरकारकडून योग्य तो मिळत नाही. तरी सरकारी फॉरेस्ट जमीनी देवून वतनदार महार, मांग लोकांच्या | पोटाचा प्रश्न मिटवावा अशी ही सभा निजाम सरकारास विनंती करते.
ठराव २ रा.--- निजाम हद्दीत राहणाऱ्या अस्पृश्य लोकांची अत्यंत हेळसांड होत आहे. तरी सरकारतर्फे त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सोय त्वरित करण्यात यावी अशी या सभेची विनंती आहे.
ठराव ३ रा.--- नवीन होणाऱ्या राज्यघटनेत निजाम हद्दीतील अस्पृश्य जनतेला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळावे अशी या सभेची निजाम सरकारास विनंती आहे.
बार्शी म्युनिसीपालिटीचे प्रेसिडेंट व ब्राह्मणेतरांचे पुढारी श्री. भातनकर यांनी । आज सकाळीच बाबासाहेबांना भेटून बार्शी म्युनिसीपालिटीचा कार्यक्रम मुक्रर |
केल्यामुळे दुपारी तीन वाजता ते बार्शीकडे मोटारने गेले. तेथे म्युनिसीपालिटीच्या बागेत बाबासाहेबांना ' अँटहोम ' पार्टी झाली. तेव्हा श्री. भातनकर यांनी बार्शी म्युनिसीपालिटीने अस्पृश्य नोकरांना, अस्पृश्य विद्यार्थ्यांना व त्यांच्या बोडिंगाला | मदत केली व पुढे करणार आहे असे सांगितले. उत्तरादाखल बोलताना बाबासाहेबांनी म्युनिसीपालिटीचे आभार मानले आणि आपल्या गंगाजळीचा अदमास पाहून म्युनिसीपालिटी असेच धोरण ठेविल अशी आशा व्यक्त! केली. तसेच जरूरीच्या कामाच्या गर्दीमुळे आपणाला मानपत्र स्वीकारता आले नसले तरी अँटहोम पार्टीला हजर झालो आहे असे सांगून श्री. भातनकर आणि त्यांचे सहकारी यांचे आभार मानले.
यानंतर वतनदार महारवाड्यात श्री. सखाराम बोकेफोडे, राजाराम बोकेफोडे | वगैरे मंडळींनी महारवाड्यात मंडपात स्त्रियांची ओवाळणी आणि इमारत फंडाला |
देगणी देण्याचा कार्यक्रम झाल्यावर बाबासाहेबांनी तेथील अस्पृश्य वस्तीला भेट दिली. तेथून ते कुर्डूवाडीला निघाले. तिथे किसन सोनवणे वगैरे बी. एल. | रेल्वेस्टाफच्या मंडळींनी हारतुरे व चहापार्टी करून इमारत फंडाला १०१ रुपये देणगी दिली. त्याशिवाय कित्येक अस्पृश्य भगिनींनी स्टेशनामध्ये येऊन बाबासाहेबांना पंचारतीने ओवाळून इमारत फंडाला देगणी दिली.
कुरडूवाडीच्या कार्यक्रमानंतर अत्यंत जरूरीच्या कामासाठी बाबासाहेबांना मुंबईस जाणे भाग पडल्यामुळे पंढरपूर, अकलूज, नातेपुते, माळसिरस येथील कार्यक्रम नाइलाजाने रहित झाले.