२३-२-१९४१ मी म्हणतो अस्पृश्य गव्हर्नर का नसावा ? - Page 409

र १८७

श्वानवृत्ती सोड्न मनुष्यत्वाची

| धारण करा

, रविवार तारीख ११ मे १९४१ रोजी मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन ३ रे,

'यातफे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेल्या इमारत फंडास ' पर्स '

अर्पण करण्याकरिता, प्रि. दोदेसाहेब, बी.ए. म्युनिसीपल कार्पोरेटर, यांच्या

अध्यक्षतेखाली जंगी जाहीर सभा आर. एम. भट हायस्कूल, परळ, मुंबई येथे

भरविण्यात आली होती. सभास्थानी अस्पृश्यांचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर येताच त्यांचे जमलेल्या जनसमूहाने टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात स्वागत केले. |

श्री. व्ही. एस. पगारे यांनी प्रि. दोंदेसाहेब यांना अध्यक्षस्थान स्वीकारण्याची

विनंती केली आणि श्री. साळवे यांनी अनुमोदन दिल्यावर अध्यक्षांनी आभार गरदर्शनार्थ प्रास्ताविक भाषण केले.

श्री. एस. डी. गायकवाड (इंटर आर्टस्‌) यांनी एकंदरीत विद्यार्थी समूहाने

इमारत फंडास कशा तऱहेने निधी जमा करण्यात आला त्याचा सविस्तर अहवाल वाचून दाखविला. सदर निधी अस्पृश्य विद्यार्थी संमेलन ३ रे यातफे जमा

करण्यात आला. संमेलनप्रसंगी काटकसर करून इमारत फंडास थोडी फार

मदत करावी, असा विद्यार्थ्यांचा मानस होता. परंतु संमेलनास जमलेला निधी

अपुरा होऊन त्यांना (विद्यार्थ्यांना) इमारत फंडास मदत करणे अशक्य झाले. ही

महत्त्वाकांक्षा पूर्ण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ४९

च्या वाढदिवसानिमित्त लहान बॅजेस तयार करून ती विकून त्यांनी एकूण

क. ८६-०-६ रक्कम जमा केली. त्यापैकी रु. ३४-१५-३ खर्च वजा जाता शिल्लक

५१-१-३ ची रक्कम येथे डॉक्टर बाबासाहेबांस इमारत फंडाकरिता अर्पण करण्यात

'धैणार आहे. सदर रकमेपैकी निम्मे अधिक रक्कम कुमारी कमल मुरवाडकर

हिने जमा केली आहे

सदर प्रसंगी वि. भंडारे व एस. जे. जाधव यांनी इमारत फंडाविषयी

परिणामकारक भाषणे केली

_ नंतर कुमारी कमल मुरवाडकर हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

गुणवर्णनपर छोटेसे भाषण करून त्यांना विद्यार्थी समितीतफे ५१ रु. १ आ

३ पै. ची पर्स अर्पण केली. (टाळ्या).

६ जनता : १७ मे, १९४१.