२३-२-१९४१ मी म्हणतो अस्पृश्य गव्हर्नर का नसावा ? - Page 410

04

डॉ. वावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे ३७२

कर्डक यांनी नाशिंक श्री. भीमराव धोंडिबा नंतर सुप्रसिद्ध जलसाकार

रु. थेली अर्पण केली आणि भाषण केले, जिल्ह्यातर्फे जनता पत्रास एकूण ११३ ची

यांनी परेल गव्हर्नमेंट गेट, लाल चाळीत तद्नंतर श्री. दगडूजी जाधव

८० रुचा पहिला हप्ता म्हणून डॉ. बाबासाहेबांना इमारत फंडाकरिता दिला. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात बोलावयास उभे राहिले. ते म्हणाले, |

' विद्यार्थी आणि बंधुभगिनींनो,

आज या ठिकाणी येताना काही महत्त्वाच्या मुद्यांवर बोलण्याचा माझा हेल होता. परंतु याठिकाणी जमलेला जनसमुदाय अतिशय अल्प असल्यामुळे तौ हेतू मी आज येथे तुम्हास सांगू शकत नाही. आज तीन वस्तीतून याठिकाणी समाजकार्याकरिता पैसे देण्यात आले आहेत. त्याबद्दल तेथील मंडळींचा मीं

आभारी आहे. |

आपणास पैशाची अत्यंत जरूरी आहे. इमारत फंडाशिवाय इतरही काही प्रसंग आपल्यावर येत आहेत. पैशाची आपत्ती सारखी वाढत आहे. इमारतीस सुरवातीला दोन-अडीच लाख रुपये लागतील असा माझ्या इंजिनियरने अंदाज केला होता. आता सिमेंट, लोखंड वगैरे सामान महाग झाल्यामुळे दोन-अडीच लाख रुपयांऐवजी ४ लाख रुपये खर्च येण्याचा संभव दिसत आहे.

चार लाख रुपयांची जबाबदारी कुठे आणि या सभेत मिळालेल्या अल्प निधीची.

जबाबदारी कुठे ? ही जबाबदारी लोकांना पार पाडणे शक्य नाही, त्यांच्यासांठी मला दुसरा उपाय योजावा लागेल. परंतु एका गोष्टीचा मला मोठा आनक

वाटतो. हल्लीच्या तुम्हा लोकात समाजकार्याविषयी उत्कट भावना निर्माण

झाली आहे. काम करण्याचा तुमचा हा उत्साह पाहून मला अत्यंत समाधान

वाटते, म्हणून येथील लोकांचा मी फार ऋणी आहे.

माझ्या स्वतःव्या मनात असे वाटते फी, वरच्या वर्गाच्या संस्था ज्या Res | कार्य करतात ते उपाय अंमलात आणावे हे चांगले. पुण्यातील च

सेवासदन सारखी संस्था घ्या. या संस्थेत मुलींना शिक्षणाचा लाभ मिळतो, त्क मुली काहीतरी काम करतात. उत्सव, सण वगैरे प्रसंगी त्या तिकिटे विकून

पुष्कळ पैसा जमवितात. पूर्वी माझ्याकडेही असे लोक येत असत पण आता मात्र

ते येत नाहीत. याचे कारण माझी हल्लीची भूमिकाही असू शकेल. |

आपले लोक सण वगैरे पाळीत नाहीत असे एका विद्यार्थ्याने सांगितले. लोक:

होळी पेटवीत नसतील, गणपती आणीत नसतील, पाडव्याच्या दिवशी तोरणे लावत नसतील परंतु सणाचा कारभार ते व्यवस्थित पार पाडीत असतील असे मला वाटते,

अशा प्रसंगाला जे लोक समाजाच्या कार्याप्रित्यर्थ तिकिटे घेऊन घरोघर फिरतील