१६-१-१९३७ या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आहेत - Page 42

ह डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

दौरा काढला असता इगतपुरी, कँप देवळाली, नाशिक, दिंडोरी, वरखेडा,

पिंपळगाव, बसवंत, ओझर, तांबट, सिन्नर वगैरे अनेक ठिकाणी केलेल्या

भाषणांचा सारांश रूपाने अहवाल खालीलप्रमाणे :--

प्रिय बंधू-भगिनींनो,

आजच्या प्रसांगी तुम्हास येथे बोलावण्याचे कारण प्रसिद्ध झालेल्या हस्तपत्राद्वारे

लुम्हास कळविले आहेच. मुंबई कायदेमंडळाच्या आगामी निवडणुकीत आपण कोणास मते देऊन निवडून आणावे याचा विचार आपणास करावयाचा आहे. या देशात अनेक राजे होऊन गेले. इंग्रजांनाही येथे येऊन उणीपुरी १५० वर्षे झाली आहेत. या १५० वर्षाच्या इंग्रजांच्या कारकिर्दीपिकी सुमारे ६० वर्षापासून ही कौन्सिले अमलात आली आहेत व या कौन्सिलाद्वारे जनतेचे प्रतिनिधी आपल्या लोकांची गाऱ्हाणी सरकारकडे मांडीत आहेत. परंतु ८ कोटी अस्पृश्य मानलेल्या वर्गातर्फे त्यांचे गाऱ्हाने मांडणारा त्यांचा प्रतिनिधी असावा ही गोष्ट जगाच्या इतिहासात आतापर्यंत घडली नाही. ती गोष्ट आपल्या प्रयत्नाने झाली आहे. येत्या एप्रिल १९३७ पासून सुरू होणाऱ्या कायदेमंडळासाठी नाशिक जिल्ह्यातील लोकास एक प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार मिळाला आहे. आता जे कौन्सिल भरणार आहे त्यात आपल्या सुखदुःखाची दाद लावण्याची संधी प्राप्त झाली आहे. आतापर्यंतचा शिरस्ता, आपली गाऱ्हाणी सरकारी अधिकाऱ्यांमार्फत मांडण्याचा असे परंतु यापुढे आपले गऱ्हाणे कायदेमंडळाकडे करावे लागेल. आपल्या सर्व सुखदुःखांचा जेथे विचार होणार आहे अशा कायदेमंडळाच्या रिंगणात तुमच्यातर्फै जाणारा मनुष्य चांगला मजबूत असला पाहिजे. ह्या जागा मानाच्या नसून गाऱ्याच्या आहेत. कायदेमंडळात जाणारा मनुष्य हा स्वत:साठी जात नसून आपल्या समाजासाठी जात आहे. समाजहिताच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या प्रश्‍नांचा साधकबाधक विचार करून कायदे-मंडळात आपल्यावतीने लढणारा मनुष्य आपण निवडून द्यावयास हवा आहे. कायदे- मंडळ हे आपल्या बचावाचे साधन आहे.

आपल्या जिल्ह्यातील पश्चिम भागातर्फै एक प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार तुम्हास मिळाला आहे. या एका जागेसाठी श्री. भाऊराव गायकवाड व रामचंद्र रोकडे असे दोन उमेदवार उभे आहेत. या दोघांनाही तुम्ही चांगल्यात-हेने ओळखता. तेव्हा याबाबत गी शिफारस करण्याचे प्रयोजन नाही.

या कायदेमंडळाद्वारे महार लोकांच्या वतनाचा विचार होणे जरूर आहे. तुम्हास जमिनी नसल्याने पडित असलेल्या जमिनी तुम्हास हव्या आहेत.