११-५-१९४१ श्वानवृत्ती सोडून मनुषत्वाची धारणा करा - Page 412

१८८
आपला स्वार्थत्याग व धडाडी [अपूर्व ] [आहे ]

परळ, मुंबई, ता. १७ मे १९४१ रोजी सायंकाळी ५-४५ वाजता परळ, लाल चाळ पंचातर्फे इमारत फंडास थैली अर्पण समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला. प्रथम पंचाचे स्वागताध्यक्ष श्री. गणपत तुळशीराम सावळेकर आणि श्री. पी. एल. लोखंडे यांची भाषणे झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बोलावयास उठले त्यावेळी प्रचंड टाळ्यांनी त्यांचे

स्वागत करण्यात आले. ते म्हणाले,

पोलीस कमिश्नरच्या हुकूमामुळे सभा होत नाही. पण मी, आपले आभार मानण्यासाठी आलो आहे. आपल्या लोकांच्या ह्या ठिकाणी १८ खोल्या आहेत. आपली जरी येथे थोडीशी वसती आहे तरी आपण इमारत फंडास मदत करून दाखविलेला स्वार्थत्याग व धडाडी अपूर्व आहे. त्याबद्दल मी आपले अभिनंदन करीत आहे. ह्या मंडळींनी आपल्या समाजाला धडा घालून 'देण्यासारखे कृत्य केले आहे. सदर वेळी काही मंडळीकडून इमारत फंडासाठी आश्वासने सुद्धा मिळाली आहेत.

शेवटी चहापान झाले व फोटो काढण्यात आल्यावर डॉ. बाबासाहेबांच्या जयजयकारात समारंभ संपविण्यात आला.

oe REISE SERS त त TO

जनता : ३१ मे १९४१.