११-५-१९४१ श्वानवृत्ती सोडून मनुषत्वाची धारणा करा - Page 413

१८९
मुला-मुलींना शिक्षण द्या : परंपरागत कामात
गुंतवू नका

रविवार तारीख १३ जुले १९४१ रोजी तीन वाजता मुंबई येथील कावसजी. जहांगीर हॉलमध्ये म्युनिसीपल कामगार संघाची वाषिक सर्वसाधारण सभा झाली. सभेचे अध्यक्षस्थान संघाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंडित केले होते. सभेस जवळजवळ दोन अडीच हजार म्युनिसीपल कामगार हजर होते.

प्रथम संघाचे सेक्रेटरी श्री. डी. व्ही. प्रधान यांनी गेल्या वाषिक सभेचा अहवाल वाचून दाखविला. तो मंजूर केल्यानंतर संघाचा वार्षिक छापलेला अहवाल वाचण्यात आला. त्याला संघाचे उपाध्यक्ष श्री. इझीकेल यांनी अनुमोदन दिल्यानंतर अहवाल सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

नंतर म्युनिसीपल कामगारांची राहाण्याची सोय उत्तम व्हावी म्हणून

म्युनिसीपालिटीने जास्त चाळी बांधाव्या या आशयाचा ठराव प्रि. एम. व्ही. दोंदे यांनी मांडला. त्याला श्री. मडकेबुवा यांनी अनुमोदन दिल्यावर ठराव सर्वानुमते पास करण्यात आला.

सध्याच्या महागाईच्या काळात म्युनिसीपल कामगारांना महागाई भत्ता देण्यात यावा या आशयाचा दुसरा ठराव श्री. टी. एस. तासकर यांनी मांडला. त्याला श्री. वाडेकर यांनी अनुमोदन दिल्यानंतर तो पास करण्यात आला.

आणखी दोन ठराव पास करण्यात आले.

तद्नंतर पुढील वर्षाकरिता कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. शेवटी डॉ. बाबासाहेब टाळ्यांच्या कडकडाटात भाषण करण्यास उभे राहिले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

म्युनिसीपल कामगार संघाच्या अहवालाचे वाचन झाल्यानंतर तुम्हाला काही सांगावे अशी माझी इच्छाच नव्हती. संघाच्या छापलेल्या अहवालावरून, संघ उत्तमप्रकारे चालला आहे, अशी कोणाचीही खात्री झाल्याशिवाय राहणार नाही. १९३८ आणि १९४० सालच्या संघाच्या सभासदांच्या संख्येकडे जर पाहिले तर १९३८ साली सभासदांची संख्या २ हजारांच्या घरात होती पण तीच संख्या १९४० साली पाच हजारांच्या घरात गेलेली आहे.

जनता : १९ जुलै, १९४१.