आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन ३७६
मुंबईमध्ये कमी आहेत असे म्युनिसीपल कामगार संघासारखे संघ,
वगैरे. त्या संघाची नाही. श्री. निमकरांचा संघ, टेक्स्टाईल युनियन वगैरे
आणि आपल्या संघाची तुलना जर केली, तर ते संघ आपल्या या म्युनिसीपल
संघाच्या पासंगालाही पुरणार नाहीत. त्या संघाच्या पुढाऱ्यांचे कार्य, मी १९१९
पासून ते १९४१ पर्यंत पहात आलेलो आहे. त्यांनी कामगार लोकांचा थोडा
देखील फायदा केलेला नाहीच, उलट नाश मात्र केलेला आहे. या लोकांनी एकंदर ३०-४० संप केले असतील, परंतु त्यातला एकही संप यशस्वी झालेला नाही. नुकत्याच गेल्या वर्षी गिरणी कामगारांचा संप त्या लोकांनी घडवून
आणिला. तो कसा तरी ३-४ आठवडे चालविला, शेवटी कामगारांच्या पदरात एक पै देखील न पडता संपाचे तीन-तेरा वाजले. ही गोष्ट आपणापैकी बऱ्याच जणास माहित असेल.
त्याउलट आम्ही २ वर्षापूर्वी फक्त एकच संप तुम्हास करावयास लावला आणि त्याला इतक्या थोड्या अवधीत यश आले की, मुंबई म्युनिसीपालिटी अपल्याला शरण आली आणि आपल्या कामगारांच्या सर्व अटी वगैरे मान्य करून त्यांना
पगारही वाढविले.
यावरून म्युनिसीपल कामगार संघाला कोणीही नावे ठेवणार नाही. या माझ्या म्हणण्याबद्दल कोणाला संशय असेल तर त्यांनी मुंबई सरकारचे लेबर गॅझेट पहावे. सरकार प्रत्येक संघाची व युनियनची मधून मधून तपासणी करीत असते
व नंतर लेबर गॅझेटमध्ये नमूद करीत असते. म्युनिसीपल कामगार संघाबद्दल
' म्युनिसिपल कामगार संघासारखा व्यवस्थित असा कोणताही संघ अथवा युनियन चालत नाही, ' असा शेरा सरकारने दिलेला आहे.
या संघाकडून जी कामे होण्याची राहिलेली आहेत त्याबद्दल संघात काम करणाऱ्या मंडळींना कोणताही दोष देता येणार नाही. संघाचे काम करणारी माणसे अगदी कर्तबगार आहेत याबद्दल मला शंका नाही. त्याबद्दल मला जर॑ कोणाला दोष द्यावासा वाटत असेल तर तो संघाच्या सभासदांना. संघात काम करणारी माणसे त्यांच्या स्वत:च्या जोरावर काहीही करू शकणार नाहीत. त्यांना तुम्हा सर्वांची मदत पाहिजे आहे आणि असे झाले तरच संघाला यश येईल. संघात काम करावयास तुम्हाला चांगली माणसे लाभलेली आहेत आणि तुम्ही जर एकीने राहाणार नाही तर मोठे दुर्दैव असेच मला म्हणावे लागेल.
मी या सभेत तुम्हाला उपदेश करतो याचा अर्थ असा नाही की, तुम्ही आणि तुमच्या मुलांनी व मुलींनी तुम्ही जे काम करीत आहात तेच काम सतत करावे. तुम्ही जे काम करता ते फार घाण आहे परंतु सध्याच्या वाईट परिस्थितीत चोऱ्या, दरोडे इत्यादि गोष्टी करण्यापेक्षा हे काम बरे असे मला