१३-७-१९४१ मुला-मुलींना शिक्षण द्या : परंपरागत कामात गुंतवू नका - Page 415

मुला-मुलींना शिक्षणद्या. . . . . कामात गुंतवू नका ३७७

| परंतु तुम्ही तुमच्या मुलांना व मुलींना शिक्षण देऊन तुम्ही जे काम करता

रा कामात त्यांना पडू न देण्याची खबरदारी घ्या. तुम्ही हे इतके घाणीचे काम

रता तेच काम दुसऱ्या जातीच्या लोकांना कितीही पैसा दिला तरी ते काम

करणार नाहीत. असे असताना या घाणेरड्या कामाचा मोबदला तुम्हाला चांगला

वरी मिळतो का ? तुम्ही जर हे काम करण्याचे नाकारले तर मुंबईत राहाणारे

क्षोक कॉलराने व इतर रोगांनी पटापट मेल्याशिवाय राहाणार नाहीत. मुंबईची

किल्ली तुमच्या हातात आहे. तुमच्याकरिता दुसऱ्याने काहीही करण्याची

जरुरी नाही. तुम्ही तुमचे भले करू शकाल एवढे सामर्थ्य तुमच्यात आहे.

श्वा गोष्टीची तुम्हाला जाणीव झाली तर सगळ्या गोष्टी सुरळीतपणे

श्रालतील. त्याकरिता तुम्ही तुमच्यात एकी ठेवली पाहिजे. चेंबूर कचरापट्टी

गैथ काही भानगड झालेली आहे असे मी ऐकतो. तेथे इतर लोक तुमच्यात बेकी

करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या त्या कपटनितींना भुलाल तर भुलून गेलेले

लोक फसल्याशिवाय राहाणार नाहीत. एकीच्या बळावर तुम्हाला वाटेल ते

करता येईल. मुंबईतील ड्रेनेज खात्यातील लोकांनी जर संप केला आणि

चेंबूरच्या लोकांनी त्यांना सहाय्य केले तर म्युनिसीपल कमिश्नर तुमच्यापुढे धावत

आल्याशिवाय राहाणार नाही. तुमच्या ह्या सामर्थ्याच्या जोरावर हिंदू-मुसलमानांच्या

तीन महिन्यांच्या दंग्यात जितका हाःहाःकार झाला त्याच्यापेक्षा जास्त हाःहाःकार

तुम्ही एक आठवड्याच्या संपाने करू शकाल. परंतु त्याकरिता तुमच्यात एकी

असणे अत्यंत जरुरीचे आहे.

म्युनिसीपल संघाच्या चार आणे वर्गणीसाठी काही लोकांकडे १० वेळा जावे | लागते ही नामुष्कीची गोष्ट आहे. पगाराच्या दिवशी पान, बिडी, सिनेमा ` वगैरे चैनीसाठी तुम्हाला पैसे मिळतात आणि संघाच्या वर्गणीसाठी ४ आणे मिळू

नये ? परंतु तुम्हाला मी निक्षून सांगतो की, जो कोणी दुसऱ्यांना जाऊन मिळेल

आणि तुमच्यात फाटाफूट करील त्याला पूर्वी ज्याप्रमाणे एखाद्या माणसाने

'जातीचा गुन्हा केला असताना त्याला वाळीत टाकण्यात येत होते त्याचप्रमाणे या

बाबतीतही करावे असे सांगण्यास मी मागेपुढे पहाणार नाही. हे तुम्ही पक्के

लक्षात ठेवा. तुमच्यात एकी असल्यावर तुमच्या गैरसोयी दूर करण्यासाठी

तुम्हास दुसऱ्याजवळ याचना करण्याची जरुरी नाही. चेंबूर कचरापट्टी येथे

आतापर्यंत चांगले काम चालले होते. तेथील लोकांची एकी वाखाणण्याजोगी

होती. परंतु तेथील अधिकारी लोकांनी काही लोकांना आमिष दाखवून तेथील

लोकात फाटाफूट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचा बंदोबस्त आम्ही

` करणार आहोतच. परंतु तुमच्यात जिल्ह्या-जिल्ह्याचे जे भेद काही लोक

: पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल मला तुम्हाला सांगावेसे वाटते. है

| म्युनिसीपल मानलेल्या लोकांकरता कामगारांकरताच आहे. आहे असे नसून ते सर्वसाधारण अस्पृश्य