१३-७-१९४१ मुला-मुलींना शिक्षण द्या : परंपरागत कामात गुंतवू नका - Page 416

३७८ डॉ. वावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

काही वर्षापूर्वी आपल्या समाजाला राजकारणात काहीही स्थान नव्हते, परंतु

आता आपला पक्ष कॉंग्रेस व मुस्लिम लीग या राजकीय पक्षाबरोबरचा झालेला

आहे. त्यांना जे महत्व ते आपल्या पक्षाला आहे. हा कशाचा

परिणाम ? आमच्यातील एकजुटीचा. त्याचप्रमाणे या म्युनिसीपल संघात हे

असले भेद असता कामा नयेत. म्युनिसीपल अधिकाऱ्यांना म्युनिसीपल कामगार

संघाचे फार वावडे होऊन बसले आहे. त्यांना हा संघ नको आहे. या संघामुळे

त्यांना पेसे, लाचलुचपत खाता येत नाही म्हणून हे अधिकारी फोडा आणि झोडा

या भेदनितीचा अवलंब करीत आहेत. म्हणून वेळीच सावध होऊन तुम्ही जर

या जिल्ह्यांचा भेद नाहीसा कराल तरच तुमचा फायदा होईल,

महार जात येथून तेथून सारखी आहे. कुठलाही महार कुठल्याही महाराच्या पंक्तीला जेवतो. त्याला कोणत्याही प्रकारे वाईट वाटत नसते. ज्याप्रमाणे कोणत्याही प्रांताचा मुसलमान बिसमिल्ला म्हणाला की, कुठल्याही दुसऱ्या प्रांताच्या मुसलमानाबरोबर जेवतो त्याचप्रमाणे महार जातीचे आहे. म्हणून जे लोक हा नाशिकचा, हा सातारचा, हा नगरचा असा भेद करून आपल्यातील एकी फोडण्याचा प्रयत्न करतील तर सर्वाचे नुकसान झाल्याशिवाय राहाणार नाही.

युरोप देशाकडे पहा. युरोपातील राष्ट्रे स्वतंत्रपणे पृथक पृथकपणे असल्यामुळे त्यांना हिटलरने पादाक्रांत केले. परंतु या सर्व राष्ट्रांनी एकी केली असती तर त्यांनी जर्मनीचा कधीच नाश करून टाकला असता. तुम्ही तुमच्यात एकी ठेवली तरच आम्हाला तुमच्याकरिता भांडता येईल, नाही तर आमच्या हातून काहीही होणार नाही. आमच्या पायाखालील मातीच जर ढासळली तर काय करणार ! म्हणून तुम्ही सर्वांनी एकोप्याने राहून म्युनिसीपल संघाचे बळ वाढवा एवढी मी तुम्हास विनंती करतो

नंतर डॉ. बाबासाहेबांनी जमलेल्या लोकास, मुंबई विधिमंडळाच्या यादीत आपापली नावे नोंदविण्यविषयी सूचना दिली व आपले भाषण संपविले.

oe ७ ७