१३-७-१९४१ मुला-मुलींना शिक्षण द्या : परंपरागत कामात गुंतवू नका - Page 417

|

१९०
? इंग्रज सरकारने आमच्यासाठी काय केले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये

हरेगाव मुक्कामी भरलेल्या मुंबई इलाखा वतनदार महार, मांग, वेठिया परिषदेच्या ठरावानुसार डॉ. साहेबांनी मुंबईचे गव्हर्नर यांच्याकडे एक विस्तृत आणि विद्वत्ताप्रचुर खलिता पाठवून, सरकारने बेकायदेशीररीत्या अस्पृश्य वर्गावर लादलेल्या जादा जुडीच्या बाबतचे आपले धोरण बदलावे अशी विनंती केली होती. परंतु सरकारने आपले धोरण अद्याप बदलले तर नाहीच, पण सिन्नर तालुक्यामध्ये काही वतनदारांवर खटले भरण्यापर्यंत सरकारी धोरणाची मर्यादा गेली आहे. अस्पृश्य समाजात तीव्र असंतोष पसरून, हरेगाव परिषदेच्या धोरणानुसारच सरकारच्या या अन्यायी धोरणाचा प्रतिकार करण्याबाबत निर्वाणीचा विचारविनिमय करण्यासाठी मु. सिन्नर, जिल्हा नांशिक, येथे ता. १६ ऑगस्ट १९४१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली वतनदार महार, मांग, वेठिया यांची प्रचंड सभा भरली होती.

सभेतील लोकसमुदाय सुमारे पंधरा हजारापर्यंत होता. नाशिक जिल्ह्यातील त्याचप्रमाणे नगर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील सर्व वतनदार प्रचंड संख्येने हजर राहिले होते. अनेक कार्यकर्ते हजर होते, त्याचप्रमाणे आ.दादासाहेब

उर्फ भाऊराव गायकवाड, नाशिक, आ. भोळे, पुणे, आ. डी. जी. जाधव, जळगाव,

आ. पी. जे. रोहम, अहमदनगर, आ. बी.एच. वराळे, बेळगाव, आ. जे. एस. ऐदाळे,

सोलापूर, आ. भाई चित्रे, रत्नागिरी, बाम्बे सेन्टीनलचे उपसंपादक मि. इझिकेल,

श्री. वि ना. बर्वे इत्यादी प्रमुख मंडळी उपस्थित होती. लोकसमुदाय अफाट

होता म्हणून लाऊडस्पिकर्सची खास व्यवस्था करण्यात आली होती.

मिरवणुकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपामध्ये अध्यक्षस्थानी

विराजमान झाले. सभेच्या कामास संध्याकाळी ५-३० वाजता सुरवात

झाली. सुरवातीला शाहीररत्न रा. घेगडे यांचे पोवाडे व गायन झाले. नंतर

सातारचे आमदार के. एस. सावंत आणि विजापूरचे आमदार आर. एस. काळे,

यांनी सभेमध्ये होणाऱ्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या तारा पाठविल्या होत्या

त्या वाचून दाखविण्यात आल्या, त्याचप्रमाणे वडाळा (मुंबई) येथील

नाशिक जिल्ह्यातील मंडळीनी सिन्नर सभेच्या निर्णयाला सर्वतोपरी पाठिबा

देण्याचा निश्चय केला आहे, हे शाहीररत्न के. अ. घेगडे यांनी जाहीर

जनता : २३ ऑगस्ट १९४१.