१६-८-१९४१ इंग्रज सरकारने आमच्यासाठी काय केले ? - Page 419

इंग्रज सरकारने आमच्यासाठी काय केले ? ३८१

पेशवाईत इनामदारांचा एक वर्ग होता. या वर्गाला सरकारमधून वर्षासन

मिळत असे. त्यांना उद्योगधंदा काही नसे. त्याचप्रमाणे देवस्थानातील पुजाऱ्यांनाही वतने होती. पेशवाई जाऊन इंग्रजी सत्ता येथे आल्यावर सरकारने

या वतनाबाबत काय केले ? ज्यांना पेशवाईत इनाम मिळत होते त्यांच्या वतनाला सरकारने मुळीसुद्धा धक्का लावला नाही. या लोकांचा सरकारला

काडीचाही उपयोग नसताना सरकारने ६,१५,६४९ रुपये इतक्या साऱ्याच्या

जमीनी या इनामदार वर्गाकडे ठेविल्या आहेत.

दुसरा वतनदार वर्ग म्हणजे सरंजाम लोकांचा होय. या लोकांना पेशव्यांनी उत्पन्न दिलेले असे. हे लोक त्या पैशावर आपल्या पदरी सैन्य बाळगीत आणि पेशव्यावर काही प्रसंग गुदरला म्हणजे किंवा लढाईमध्ये हे सैन्य पेशव्याच्या मदतीला देत असत. परंतु इंग्रजांचे लष्करी धोरण अगदीच वेगळे आहे. सैन्याच्या बाबतीत त्यांचे परावलंबी धोरण नव्हते. हे सरकार स्वखर्चाने सैन्य बाळगते. अर्थातच पेशवेकाळचे सरंजामी लोक कुचकामी ठरले, सरकारला त्याचा काही एक उपयोग उरला नाही. तथापि, सरकारने त्यांच्या वतनाला हात लावला नाही. या सरंजामी लोकांना घर बसल्या सरकारी तिजोरीतून २,६७.५०० रुपये इतके पेन्शन दिले जाते.

सरंजामदार, पुजारी यांच्याप्रमाणेच पेशवाईमध्ये देशमुख, देशपांडे हे नोकरीला असत. परंतु ही वतने वारसाहक्काने चालत असल्याकारणाने सरकारला नको होती. मामलेदाराची जागा त्याच्या मुलाला लायकी नसताना

दिली तर राज्यकारभारामध्ये घोटाळा उत्पन्न होईल म्हणून पगारी मामलेदार नेमण्यात आले. पूर्वीच्या देशमुख-देशपांड्यांचा सरकारला काही उपयोग

नाही. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की त्यांच्याकडे असलेल्या जनीनी काढून

घेण्यात आल्या नाहीत. त्या त्यांच्याकडेच ठेवल्या. इतकेच काय पण

सरकार त्यांच्याकडून ८,१४,५४५ रुपये इतक्या साऱ्याऐवजी फक्त २ लाख रुपये

सारा घेते.

तुमच्याप्रमाणेच पूर्वीच्याकाळी लोहार, सुतार, परीट, न्हावी इत्यादी बारा

बलुतेदार काम करीत असत. परंतु १८६३ साली सरकारने या लोकांना

नोकरीतून मुक्त केले. त्यांची वतने सरकारने त्यांना बहाल केली. त्यांच्या

जमिनी त्यांना बहाल केल्या. हल्ली असलेल्या तलाठ्यांच्या ऐवजी पूर्वी

वतनदार कुळकर्णी होते. सरकारने कुळकर्ण्यांचे वतन खालसा करून

पगारी तलाठी नेमले. कुळकर्ण्यांचे वतन खालसा केले तरी त्यांच्याकडे

असलेल्या जमीनी पूर्वीच्या अल्प जुडीइतक्या साऱ्यावर त्यांना बहाल

केल्या. इतकेच नव्हे तर काही एक सरकारी काम न करता त्यांना पूर्वीप्रमाणे