१६-८-१९४१ इंग्रज सरकारने आमच्यासाठी काय केले ? - Page 420

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३८२

इतर जे वतनदार होते त्यांना सरकारने पोटगीही मिळते ! आमच्याप्रमाणे

मग आम्हालाच असे का असे न्याय्य आणि उदारबुद्धीने वागविले.

वागविले ? सरकार २,००,००० रुपये या घरबशा लोकांना फुकट देते आणि

जे बिचारे महार, मांग आणि वेठियां उन्हातान्हाची पर्वा न करता दिवसाचे

चोवीसही तास सरकारी कामासाठी राबतात त्यांच्यावरच इतका अन्याय आणि

जुलूम का, असा माझा सरकारला आव्हानपूर्वक सवाल आहे.

गेल्या दहा-पंधरा वर्षापासून तो आतापर्यंत माझा कटाक्ष स्पृश्य हिंदू आणि

काँग्रेस इत्यादी या देशातील लोकांविरुद्ध होता. आजपर्यंत हिंदू धर्म आणि

हिंदू समाज यांच्यावर मी हल्ले चढवीत होतो. परंतु सरकारला मी खात्रीपूर्वक

सांगू इच्छितो की जितक्या निकराने मी हिन्दू समाजावर हल्ले चढविले त्याच्या

शतपटीने तीव्र हल्ले सरकारविरुद्ध चढवीन. मी केव्हाही सरकारविरूद्ध

बोलत नसे म्हणून माझ्यावर अनेक जण सरकारनिष्ठ, देशद्रोही, जातीनिष्ठ असे

आरोप करीत असतात. परंतु आपणा सर्वांना ही गोष्ट कबूल करावी लागेल की कोणी कितीही प्रबळ असला तरी चोहोबाजूस शत्रूवर हल्ला करू शकणार

नाडी. केव्हाही मी एकेका शत्रूवर हल्ला चढवून त्यांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होतो. याच धोरणाने मी आजपर्यंतचा लढा लढवीत आलो आहे. परंतु ज्या सरकारशी आम्ही पूर्ण इमानाने वागलो ते सरकारच आता आमच्यावर उलटले आहे ! वास्तविक, या देशामध्ये इंग्रजांचे राज्य आम्ही आणले, हे ऐतिहासिक सत्य आहे. इंग्रजांच्या बाजूने रक्‍त सांडून पेशवाईचा

अंत आम्ही केला. १८१८ साली पेशवाईचा संपूर्ण अंत झाला. यासाली खर्ङ्याच्या निर्णयात्मक लढाईमध्ये इंग्रजांना विजय मिळाला तो केवळ महार

वीरांच्या सहाय्यामुळेच होय. याची साक्ष कोरेगाव येथे उभारलेला विजयस्तंभ देऊ शकेल. त्या विजय स्तंभावर दोन नावे इंग्रजांची, चार पुरभय्याची आणि बाकीची सर्व नावे महार वीरांचीच आहेत !

ज्यांना आम्ही राज्य मिळवून दिले तेच आता आम्हावर लाथा झाडण्यास सिद्ध झाले आहेत. आम्ही मिळवून दिलेल्या इंग्रजी राज्यात आमचा काही फायदा होण्याऐवजी उच्च वर्णीयांचाच फायदा झाला आहे. तुम्ही वाटेल त्या सरकारी ऑफिसमध्ये जाऊन पाहा. तुम्हाला हाच अनुभव येईल. सरकारने स्पृश्य

हिंदुंकडे लक्ष दिले, मुसलमानांच्या वाटेल त्या मागण्यास मान्यता देऊन त्यांना हिंदूंच्या इतके राजकीय महत्त्व दिले पण आपणाकरता काय केले ? गेल्या दीडशे वर्षाच्या आमदानीत ब्रिटिश सरकारने अस्पृश्य समाजासाठी काय केले, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.