१६-१-१९३७ या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आहेत - Page 43

या जागा मानाच्या नसून माच्याच्या आहेत पु

आपला समाज शिक्षणात मागासलेला असल्याने आपल्या मुलाबाळांना योग्य असे शिक्षण मिळाले पाहिजे. गरिबी असल्यास सरकारी स्काँलरशिपा मिळाल्या

पाहिजेत. तुम्हास अस्पृश्य लेखल्यामुळे तुमची झालेली कुचंबणा थांबविण्यासाठी अस्पृश्यता निवारणाविषणी कायदा होणे जरूर आहे. आपल्या लोकांची सरकारी नोकरीत योग्य त्या प्रमाणात भरती होणे जरूर असल्याने त्याबाबत तशी तरतूद झाली पाहिजे. अशा एक ना दोन शेकडो गोष्टी या कायदेमंडाळाद्वारे झगडून मिळविल्या पाहिजेत. हे कार्य या दोन उमेदवारांपैकी कोण करील असे तुम्हास वाटते ? (गायकवाड करतील, असे लोक ओरडतात).

नेहमीच्या व्यवहारात आपण असे पाहतो की जर एखाद्या इसमास घर बांधावयाचे असल्यास सुताराची गरज लागली तर जो सुताराचे काम जाणतो त्यासच आपण त्या कामी लावतो. गवंड्याचे कामासाठी गवंडी काम जाणणास्यासच नेमतो. तद्वतच कायदेमंडळात व्हावयाची कामे कोण चांगल्याप्रकारे करील हें लुम्ही विचार करून ठरविणे अत्यंत जरूर आहे. तेथे आंगाजांघाचा पाहता कामा नये. सोयऱ्या धायऱ्याचे नाते ओळखता कामा नये, अगर आपसातील वेषाने प्रेरित होऊन सूडाच्या भावनेने भांबावता कामा नये. आपली गाऱ्हाणी कायदेमंडळात मांडून जो ती निवारण करील असे तुम्हास वाटते त्यासच

आपण मते देऊन निवडून आणणे जरूर आहे. जो मनुष्य कायदेमंडळासाठी

लायक असेल त्यासच कायदेमंडळात पाठवा.

आता आपल्यापुढे एका जागेसाठी उभे राहिलेल्या दोन उमेदवारात जास्त लायक कोण हे पाहणे अत्यंत जरूर आहे. श्री. भाऊराव गायकवाड यांनी गेली कित्येक वर्ष केलेली सार्वजनिक सेवा मशहूर आहे. लोकल बोर्ड व नासिक म्युनिसिपालिटीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर गेली केक वर्षे जबाबदारीची कामे केली आहेत. आपल्या जिल्ह्यातील लोकांची गाऱ्हाणी सरकार दरबारात मांडून ती निवारण करण्याचे प्रयत्न गेल्या सहा-सात वर्षापासून ते करीत आहेत. नाशिक जिल्हा हा अस्पृश्य मानलेल्या समाजाच्या चळवळीचे केद्र झालेले आहे. गेली पाच-सहा वर्ष या जिल्ह्यात चळवळीचा किती मोठा धुमाकूळ माजला होता. याची जाणीव तुम्हा सर्वाना आहे. त्या सर्व चळवळीत त्यांनी माऱ्याच्या व जबाबदारीच्या जागी राहून केलेली सेवा तुमच्या नजरेपुढे आहेत. त्या चळवळीत कित्येक प्रसंगी मारहाण तर कित्येक प्रसंगी सरकारकडून दड तर कित्येक प्रसंगी लुरुंगवासाच्या सक्त मजुरीच्या शिक्षाही त्यांनी भोगल्या