इंग्रज सरकारने आमच्यासाठी काय केले ? ३८३
आज आपणासमोर किती बिकट परिस्थिती उभी राहिली आहे ? पूर्वी गावात
किंवा खळ्यावर पोटापाण्यासाठी [थोडेतरी ] [मिळत ] [असे, ] [पण ] [आपण ] [उभारलेल्या ]
चळवळीमुळे ते आता सारे बंद झाले आहे. सरकार अंमलदारासाठी आपली तिजोरी उघडी करू शकते पण आपणाला मात्र एक रुपयासुद्धा द्यावयास तयार नाही. इतकेर्च नाही तर आमच्या तोंडात असलेला घास काढू पाहात [आहे, ] [परंतु ]
सरकारचे वाटेल ते आव्हान स्वीकारण्यास मी तयार आहे. मी सरकारला आव्हानपूर्वक बजावतो की तुम्ही वाटेल तो उपाय योजिला [तरी ] [जादाजुडीविषयी ]
अंमलात आलेल्या धोरणाचा मी तितक्याच निकराने प्रतिकार [केल्याखेरीज ]
राहाणार नाही. | ।
मी आजपर्यंत सरकारविरुद्ध वागलो [नाही. ] मी काँग्रेसला मिळून त्यांच्या लढ्यात सामील झालो नाही [किंवा ] [कोणत्याही ] [दंग्यात ] [भाग ] [घेतला ] [नाही. ] या देशामध्ये शांतता राखण्याचा माझ्याइतका [प्रयत्न ] [कोणीही ] [केला ] [नसेल. ] परंतु सरकारला त्याची जाणीव राहिली [नाही. ] आज सरकारला आपण नको [आहोत, ] हिंदुंना नको आहोत, मुसलमान [डोक्यावर ] [बसले ] [तरी ] [चालतात. ] इंग्रजांना जो नेहमी सतावीत राहील त्याला [मात्र ] [सरकार ] [नमते. ] आपण इतके दिवस जो खोटा विश्वास इंग्रज सरकारबद्दल [धरला ] [होता ] [त्यावर ] [आज ] [तिलांजली ] [दिली ] पाहिजे. हा एक लढा, संग्राम आहे. मी पाठविलेल्या खलित्याचे [उत्तर ] [सरकार ] देऊ शकणार नाही. कारण मी मांडलेली [बाजू ] [न्याय्य ] [आणि ] [सत्य ] [आहे. ] मला सरकारला असे सांगावयाचे [आहे ] [की ] [आमचे ] [मागणे ] [अमान्य ] [करावयाचे ] [असेल ] [तर ] त्याचा परिणाम फार विघातक [होणार ] [आहे. ] आमची मागणी अगदी [साधी ] [आहे ]
आणि तीही पोटाच्या [प्रश्नाची ] [आहे. ] आमची मागणी ही [आहे ] [की ] [ज्याप्रमाणे ] [इतर ] वतनदारांना जमिनी देऊन [त्यांना ] [वतनदारीतून ] [मुक्त ] [केले ] [त्याचप्रमाणे ] [आम्हालाही ]
आमच्या जमिनी देऊन [वतनदारीतून ] [मुक्त ] [करा. ] इतर वतनदार काही [एक ] [कामे ] न करता आयते खातात [त्याचप्रमाणे ] [आम्ही ] [मागत ] [नाही, ] हे जर सरकारला [मान्य ]
नसेल तर कायदे [कौन्सिल ] [भरल्यावर ] [स्पृश्य ] [हिंदुंचे ] [प्रतिनिधी ] [आणि ] [आमचे ]
प्रतिनिधी यांच्यावतीने [आम्ही ] [हा ] [प्रश्न ] [आपसात ] [सोडवू. ] परंतु तिकडेही
सरकारने लुडबूड [करण्याचा ] [जर ] [प्रयत्न ] [केला ] [तर ] [त्याचा ] [प्रतिकार ] [केल्याखेरीज ]
आम्ही राहाणार नाही. |
आपला प्रतिकार कसा असेल हे आजच काही सांगता येणे शक्य
नाही. कारण ते सर्वस्वी सरकारवर अवलंबून आहे. सरकार जे धोरण
स्वीकारील त्या दिशेने आपणाला प्रतिकाराचे स्वरूप ठरवावे लागेल. ते काहीही
झाले, तुमच्या प्राणावर बेतले तरी तुम्ही आपल्या जमीनी सोडू नका. भाऊराव
गायकवाडांना कधी अटक होईल ते सांगता येत नाही. त्यांना आता अटक झाली
तरी ती आनंदाची गोष्ट आहे. त्यांची जागा भरून काढण्यास अनेक लोक सिद्ध