डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३८४
सरकार तुमच्यावर आहेत. या पुढारी लोकांच्या अटकेनंतर
करील. पोलीस आणील, तथापि, कोणीही डगमगता कामा नये.
जमीनी जप्ती आली तर प्रतिकार करा. सामान नेऊ देऊ नका.
केल्या तर कुदुंबासहित शेतावर झोपड्या बांधून राहा. पोलिसांनी गोळीबार[ केला तरी शेतातून हटू नका. एखादे कुटुंब तुरुंगात गेले तर त्याच्या इतर नातलगांनी ती जागा भरून काढून सरकारचा प्रतिकार केला पाहिजे.
या लढ्यामध्ये आपणास कोणी साहाय्य करणार नाही. तो आपण स्वसामर्थ्यावर लढवावयाचा आहे. इतरांचे साहाय्य नसेल तरी ही गोष्ट आपण
पणास लावलीच पाहिजे. मी वापरलेल्या भाषेवरून माझ्या मनामध्ये सरकारविरूद्ध किती असंतोष उत्पन्न झाला आहे याची आपणास कल्पना
येईल. सरकारच्या या अन्यायी धोरणाला इतरत्र तोड नाही. बार्डोलीला
काँग्रेसने सरकारी शेतसारा देण्याचे साफ नाकारले. त्यावेळी सरकार
काँग्रेसला सरळ शरण गेले आणि काँग्रेसच्या कमिशनने ठरविलेला सारा मान्य केला. काँग्रेसला पैसा-बळ आणि माणूस-बळ यांची काही उणीव नव्हती. आपली त्या दोन्ही दृष्टीने बाजू कमी आहे. तथापि, न्याय आणि नीती
आपल्या बाजूला आहे, हे लक्षात असू द्या. शेवटी .आपल्या न्याय्य बाजूचाच
विजय झाल्याशिवाय राहणार नाही.