१९१
इंग्रजांना वाचविण्यात यावे म्हणून नाही
तर आपल्या घराची राख [रांगोळी ] [होऊ ] [नये ] [म्हणून ] [. ] . .
गेले महायुद्ध बंद झाल्यापासून महार लोकांना पलटणीमध्ये घेण्यात येत नव्हते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळे येत्या ऑक्टोबर महिन्यापासून महार लोकांच्या दोन पलटणी उभारण्याचे हिंदुस्थान सरकारने ठरविले आहे. त्यानुसार महार तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि पलटणीमध्ये भरती व्हावे म्हणून बुधवार, तारीख २४ सप्टेंबर १९४१ रोजी रात्रौ ९ वाजता आर. एम. भट हायस्कूल परेल येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. सभेत इतका जनसमुदाय लोटला होता की, हॉल व गच्ची भरून बाहेर देखील लोकांना ताटकळत उभे राहावे लागले.
बरोबर सव्वा नऊच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभास्थानी आले. त्यावेळी बाबासाहेबांच्या जयघोषात व टाळ्यांच्या कडकडाटात वातावरण दुमदुमून गेले. नंतर ' जनता ' पत्राचे मॅनेजर श्री. के. व्ही. सवादकर यांनी सभेचे प्रयोजन काय वगैरे जनसमुदायास सांगून बाबासाहेबांना बोलण्यास विनंती केली.
बाबासाहेब टाळ्यांच्या कडकडाटात बोलावयास उठले. ते आपल्या भाषणात
म्हणाले,
सद्गृहस्थहो !
आजच्या या तातडीने बोलाविलेल्या सभेचा मुख्य हेतू हिंदुस्थान सरकारने
आपल्या समाजाकरिता ज्या दोन बटालियन्स उभारलेल्या आहेत त्याबद्दल मी
आपणास माहिती सांगावी असाच आहे. १९३२ साली १११ वी महार पलटण
उभारण्यात आली होती. त्या पलटणीतील शिपायांनी गेल्या महायुद्धात महार
समाजाचे क्षात्रतेज लोकास दाखवून दिले होते. परंतु महायुद्ध संपल्यानंतर
सरकारने ही पलटण कमी केली. त्यानंतर पलटणीमध्ये भरती व्हावे म्हणून
बऱ्याच महार तरुणांनी अर्ज केलेले होते. परंतु त्यांना पलटणीत घेण्यात येत
नव्हते. चालू असलेले हे युध्द झाल्यानंतर सरकारने अस्पृश्य लोकांचे कामगार
पथक (2७०५7 0०/०5) उभारण्याची योजना पुढे आणली. याबाबतीत
ज्यावेळेस मला विचारणा करण्यात आली त्यावेळेस मी सरकारला सांगितले की,
तुम्ही ज्याअर्थी अस्पृश्यांना पलटणीत घेत नाही, त्याअर्थी आमचे लोक तुमच्या
जनता : २७ सप्टेंबर, १९४१.