१६-८-१९४१ इंग्रज सरकारने आमच्यासाठी काय केले ? - Page 424

आणि भाषणे डॉ. बावासाहेव आंबेडकर लेखन ३८६

माणसांना पलटणीत सामील करून माणसे पाहिजे असतील तर जमो दर आमच्या

१ आला व आपली एक| घ्या. माझ्या सांगण्याचा सरकाच्च्या मनावर 1”

पलटण उभारण्याचे सरकारने निश्चित केले. आणखी दुसरीही एक पलटण उभारण्याचे आश्वासन मला देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मी त्यांना असेही सांगितले होते की, पलटणीतील महारलोक शिपाई व त्यांच्यावरचे अधिकारी इतर वरच्या जातीचे असता कामा नये. तर आधिकारी देखील महारांचेच पाहिजेत. याही माझ्या म्हणण्याला सरकारने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार आपले लोक जमेदार, सुभेदार याच हुद्यावर घेतले जातील असे नसून लेफ्टनंट | सारख्या हुद्यावर देखील घेतले जातील, येथपर्यंत ही गोष्ट येऊन ठेपलेली आहे. गेल्या शनिवारी माझी व ना. गव्हर्नरांची मुलाखत झाली. तेथे मला सांगण्यात आले की आतापर्यंत ६००-७०० अस्पृश्यांनी या नव्या पलटणीमध्ये नावे दिलेली आहेत. परंतु त्यांना वाणवा जर कशाची असेल तर अधिकाऱ्यांच्या जागा | भरण्याकरिता आपल्यातील लायक उमेदवारांची. मला असेही सांगण्यात आले

की, ज्याप्रमाणे आम्ही तुमच्या अटी मान्य केल्या, त्याचप्रमाणे अंमलदारांच्या जाया भरण्यासाठी तुमच्यातील लायक माणसे पुरविण्याचे कर्तव्य तुमचे आहेः म्हणून आपणं अंमलदारांच्या जागेकरिता, दोन्हीही पलटणीकरिता लायक उमेदवार पाठविणे जरूरीचे आहे.

काही लोकांच्या मनात या पलटणी बाबत शंका उत्पन्न झाल्या आणि त्यांनी

मला विचारले की, ' सरकारने व्हाइसराॉयच्या विस्तृत केलेल्या कार्यकारी मंडळात अस्पृश्यांचा एकही प्रतिनिधी घेतला नाही व त्याचप्रमाणे सरकारने महार वतनावर जुडी लादल्यामुळे हल्ली आपण या अन्यायाविरूद्ध चळवळ करीत आहोत मग त्याच सरकारला आपण लष्करात भरती होऊन मदत कशी करावयाची ? याच

प्रश्‍नांची उत्तरे देण्याकरिता आजच्या सभेचा मुख्य हेतू आहे.

हल्ली हिंदुस्थानातील. इतर समाजांची विचारसरणी कशी आहे ती मी तुम्हास सांगतो काँग्रेस म्हणते की, ज्याअर्थी इंग्रज लोक आपल्याला स्वराज्य देत नाहीत त्याअर्थी आपणही त्यांना मदत करू नये. याबाबत मी आपणास दोन

गोष्टी सांगतो. त्यातली पहिली अशी की, समजा एका मनुष्याच्या मालकीचे घर आहे. त्यात मालकाला जबरदस्तीने बाहेर काढून एक माणूस शिरलेला आहे. दुसरा एक माणूस येऊन घरात गेलेल्या पहिल्या माणसाला बाहेर निघण्यास सांगत आहे व तों बाहेर निघत नाही असे पाहून त्या घराला आग लावील म्हणून धमकी देत आहे. तीच गोष्ट हल्ली झालेली आहे. आपणया देशाचे मालक आहोत व आपल्या देशात इंग्रज हे घुसलेले आहेत. ते येथून जावेत अशीच इतरांप्रमाणे आपली इच्छा आहे. जर हिटलर आला आणि इंग्रजांना म्हणू लागला की, तुम्ही या देशातून जा, नाहीतर या देशाची मी राख-रांगोळी करील. सांगा, तसे त्याने केले तर कोणाचे नुकसान होईल ? हे नुकसान इंग्रजांचे होणार नाही. तर या देशातील लोकांचे होणार आहे, हे तुम्ही

पक्के लक्षात ठेवावयास पाहिजे.