२४-९-१९४१ इंग्रजांना वाचविण्यात यावे म्हणून नाही तर आपल्या घराची राखरांगोळी होऊ नये म्हणून - Page 426

३८८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ते साधवून घेत आहेत. लष्करात शेकडा ८० लोक मुसलमान आहेत,

५० अंमलदार आहेत व शेकडा ८० ते ९० मिलिटरी काँट्रॅक्‍्टर्स मुसलमान

आहेत. अशी खरी वस्तुस्थिती आहे. मुसलमान लोक दांडगाई पेक्षा

व्यवहाराकडे पहात असून ते वाहत्या नदीत हात धुवून घेत आहेत. मुसलमान

लोकांनी जर ब्रिटिशांना नाही म्हटले तर ब्रिटिशांना त्यांची मनधरणी करावी लागेल. कारण मुसलमानांच्या हातात शक्ती आहे. तशी परिस्थिती आपली नाही. आपण सर्व दृष्टीने नाडलेलो आहोत. असे असताना देखील त्यांनी

आपल्या अटी कशा मान्य केल्या याचेच मला आश्चर्य वाटते.

म्हणून कॉलेजामध्ये शिक्षण घेणारे व त्याचप्रमाणे इतर सुशिक्षित तरूणांनी उभारण्यात आलेल्या या दोन पलटणी मधील अंमलदारांच्या जागा पटकाविण्याकरिता पुढे झाले पाहिजे. सरकारने मला असेही आश्वासन दिलेले आहे की, जर यदाकदाचित युद्धानंतर या पलटणी मोडल्या तर पलटणीतील लोकांना सिव्हीलमध्ये चांगल्या नोकऱ्या देण्यात याव्यात याबद्दल तजवीज करण्यात येईल. तेव्हा तुम्हास सांगावयाचे की, एवढ्या सवलती आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. त्यांचा फायदा करून घेणे आपणावर अवलंबून आहे. जी शिकलेली माणसे आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी आहे, हे विसरता कामा नये.

आपल्या तरूणांनी सावलीत बसण्याची प्रवृत्ती सोडून दिली पाहिजे. माझी देखील अशीच इच्छा होती की, सावलीत काम मिळावे. हल्ली सर्व लोक महाराविरूद्ध आहेत. इतर जातींच्या मनात मांगाविषयी, चांभाराविषयी, भंग्याविषयी प्रेम आहे, परंतु महाराविषयी मात्र नाही. त्याचे कारण दुसरे तिसरे नसून मी आहे. इतर लोक मला पिशाच्च म्हणून समजतात आणि माझ्या भोवताली असलेल्या महारांना भुतावळ म्हणून मानतात. १९२६ पासून अस्पृश्यांच्या न्याय्य हक्काकरिता मी भांडत आहे. अस्पृश्यांना पोलिसमध्ये घ्यावे म्हणून मी सरकार जवळ भांडलो आणि त्याचा फायदा म्हणजे हल्ली २ चांभार व १ मांग सब-इन्स्पेक्ट्स आहेत. महार एकही नाही ! याचे कारण काय ? ज्या महार उमेदवारांना मुलाखतीस बोलविण्यात आले होते त्यांना तुम्ही डॉ. आंबेडकरांचे अनुयायी आहात का असे प्रश्‍न विचारण्यात आले. त्यांनी होय म्हटले, त्यांची निवड करण्यात आली नाही. आता पोलीस सब-इन्स्पेक्टरच्या जागेशी माझ्या अनुयायित्वाचा काय संबंध आहे ? त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात आपल्या काही पदवीधरांना मामलेदारांच्या जागेकरिता मुलाखतीकरिता मध्य भागातील रेव्हेन्यू कमिश्नरने बोलाविले होते, त्यांना तेथे जुडीविषयी प्रश्‍न विचारण्यात आले. गेलेले तिघेही उमेदवार महारच असल्यामुळे एकाचीही निवड झाली नाही. पण मला या अधिकाऱ्यांना असे विचारावयाचे आहे की, जादा जुडीचा व उमेदवारांच्या मुलाखतीचा काय संबंध आहे ? आणि त्या जुडीबाबत योग्य उत्तरे मिळाली असताना देखील एकही महार उमेदवारला का