१९२
आपल्या संरक्षणासाठी संरक्षक दले उभारा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेल्या इमारत फंडास आर. आय. एन्. डॉकयार्ड फँक्टरीतील मिल राईट शॉप मधील अस्पृश्य कामगारांतर्फे रविवार ता. ११ जानेवारी १९४२ रोजी डॉ. बाबासाहेब आंड यांना १०१ रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. सभेचे नियोजित अध्यक्ष महाशय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगमनाप्रसंगी सभास्थानी जमलेल्य प्रचंड जनसमूहाने टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात व त्यांच्या जयघोषात त्यांचे अपूर्व स्वागत केले. सभेस सुरवात श्री. बी. एस. गायकवाड यांनी केली. म्हणाले, या सभेचा विशेष असा की, माझे मित्र एल. एस. रोकडे, यांनी मिल राईट शॉप मधील आपल्या २०-२५ कामगार बंधुंच्या साह्याने ही अल्पशी थैर्ल डॉ. बाबासाहेबांच्या इमारत फंडास अर्पण करण्याचा घाट घडवून आणला याबइ ते व त्यांचे अस्पृश्य कामगार बंधू अभिनंदनास पात्र आहेत. नंतर इमारत फं जनरल सेक्रेटरी श्रीयुत उपशाम मास्तर यांचे भाषण झाले.
डॉ. बाबासाहेबांच्या भाषणापूर्वी श्री. एल. एस. रोकडे यांनी बाबासाहेबांच्या इमारत फंडास १०१ रु. ची थैली अर्पण केली.
नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात ब पास उभे राहिले. ते म्हणाले,
बंधुंनो व भगिनींनो,
आज या ठिकाणी इमारत फंडाची सभा आहे म्हणून मी हजर राहिलो
आहे. वास्तविक १०० रु. च्या थैलीकरिता प्रत्येक ठिकाणी हजर राहाण्याचे मी ठरविले तर मला माझे आयुष्यही पुरणार नाही. परंतु हे १०० रु. फक्त मिल राईट शॉपमधील अवघ्या २२ मुलांनीच जमा केले आहेत ही गोष्ट आनंदाची आहे. दुसरे कारण असे की डॉकयार्डमध्ये वाडिया खात्यात आपले ४० व इतर १०० कामगार आहेत. त्यांनी त्या कामास अद्याप हातभार लावलेला नाही. कदाचित मी सांगितले असता ही मंडळी इमारत फंडास मदत करतील असे मला सांगण्यात आल्यावरून मी या ठिकाणी हजर राहिलो आहे. या ठिकाणी ती माणसे हजर आहेत की नाही, हे मला माहीत नाही, परंतु जे
जनता : १७ जानेवारी १९४२.