२४-९-१९४१ इंग्रजांना वाचविण्यात यावे म्हणून नाही तर आपल्या घराची राखरांगोळी होऊ नये म्हणून - Page 429

३९१ आपल्या संरक्षणासाठी संरक्षक दले उभारा

इतर कामगारांना सांगून या मुलांनी हजर असतील त्या माणसांनी आपल्या

इमारत फडास मदत करावी, अशी मी त्यांना घालून दिलेल्या उदाहरणाप्रमाणे

विनंती करतो.

सव्वालाख माणसानी दोन रुपये इमारतीकरिता मी सांगितल्याप्रमाणे लाख

प्रमाणे देणगी दिली असती तर आता ती इमारत कदाचित्‌ आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलीही असती. इमारत फंड जमा होण्यास इतका अवधी लागावा यात काहीतरी संकेत असावा आणि मजजवळही इतके पैसे जमा झाले असते, तरी कदाचित्‌ मी ही इमारत बांधली नसती. कारण हल्लीची युद्धजन्य- परिस्थिती होय. लढाई युरोपच्या पश्चिमेच्या एका कोपऱ्यात सुरू झाली. ती आता पूर्वेस

आपल्या दाराजवळ आली आहे. बाँबच्या माऱ्याने इमारती, शहरे बेचिराख होत

आहेत. अशावेळी आपली इमारत जर बाँब हल्ल्यास बळी पडली तर असमर्थ

अस्पृश्य समाजाला परत ती उभी करणे मुष्कील झाले असते. तथापि,

रा. उपशाम मास्तर यांनी सांगितल्याप्रमाणे जागा तरी आपल्या मालकीची करून

घेणे जरूर आहे.

लढाईमुळे माणसे विवंचनेत आहेत. अशी जरी परिस्थिती असली तरी.आपण

सर्व लोक लढाईत मरणार नाहीत, हे खास. काही मरतील तर काही जगतील.

तेव्हा मेलेल्यांनी जगणाऱ्यांसाठी काहीतरी विचार करणे अगत्याचे आहे. लढाईत

काय होईल ? असा अदूरदर्शीपणा करणे योग्य नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावयाची आहे. या सभेने मला ती

सांगण्याची संधी दिली आहे. दुसरीकडे अशी संधी मला मिळाल्यास मी ती गोष्ट

जरूर सांगेन. हल्ली चोहोकडे ' ब्लक आऊट ' आहे. जपानी विमाने

घिरट्या घालीत आहेत. लढाई दाराजवळ आली आहे. अशा वेळी आपली

बायकामुले तसेच निरूपयोगी माणसे आपापल्या गावी पाठवावे, हे बरे. सरकारी

हुकूम मिळेपर्यंत थांबणे धोक्याचे आहे. पेट्रोल नियंत्रणामुळे तुम्हाला मोटार

मिळणार नाही. ट्रेन्स (आगगाड्या) अशा किती उपयोगात आणता येतील याचा

विचार करा. दुसरे असे की या शहरात पुष्कळ गुंड व बदमाश लोक दबा धरून

आहेत. त्यांच्यापासून संरक्षण करण्याकरिता तुम्ही चाळीचाळीतून, प्रत्येक

मोहोल्ल्यातून संरक्षक दले तयार करा आणि संघटनेने रहा. |

शेवटी, या ठिकाणी आलेले मि. एफ. डब्ल्यू. शॉर्टलंड या साहेबांचे सभेच्यातफे

अभिनंदन करावयाचे आहे. या साहेबांनी आपल्या २०-२२ माणसांना कामावर

लावलेले आहे, असे मी ऐकतो. वास्तविक २८-२२ माणसांना कामाला लावणे

म्हणजे मोठीच बाब आहे असे नाही. पण आपणाला नोकरीच्या बाबतीत