११-१-१९४२ आपल्या संरक्षणासाठी संरक्षक दले उभारा - Page 430

३९२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अतिशय वाईट अनुभव येतो. येथेच धोबीतलाव जवळ सैन्यात भरती करण्याचे रिक्रुटिंग ऑफिसरचे ऑफिस आहे. आपली दररोज काहीतरी दहापंधरा मुले भरतीसाठी जात असतात. तेव्हा कोणाची छाती कमी, कोणाचे वजनच कमी, कोणाचे काहीना काही तरी कमी असे सांगून त्यांना परत पाठवतात. उलट स्पृश्य तरूण कसाही असला तरी तो भरती झाल्यावाचून रहात नाही, असे दररोज मला सांगण्यात येते. कारण हे की, भरती करणारे ऑफिसर स्पृश्य आहेत. या दृष्टीने पाहिले असता या साहेबांनी या कामावर लाविलेल्या माणसांवर उपकार केले हे उघड आहे. याबद्दल मी मि. शार्टलंड साहेबांचे अभिनंदन करतो.

सदर प्रसंगी रॉयल इंडियन नेव्ही येथील राईट खात्यातील फोरमन मि. शॉर्टलंड साहेब यांनी हिंदीत छोटेसे भाषण केले.

सदर सभेच्या शेवटी इमारत फंडाचे जनरल सेक्रेटरी श्री. शा. अ. उपशाम यांनी जाहीर केले की, सदर सभेत इमारत फंडास मिळालेल्या सर्व रकमा जमेस धरून आज इमारत फंड १०,१२९ रु. ७ आ. ३ पै. इतका जमा झाला आहे.

नंतर इमारत फंडाचे असि. सेक्रेटरी श्री. बी. एस. गायकवाड यांनी बाबासाहेबांचे व इतर मंडळींचे समयोचित भाषणात आभार मानले व अध्यक्षांच्या | परवानगीने सभा बरखास्त झाल्याचे जाहीर केले.