१९३
आपला उद्धार इतर करणार नाहीत
त्यासाठी आपणच कंबर कसली पाहिजे
( मुंबई, दिनांक २६ एप्रिल १९४२)
मी सार्वजनिक कार्यामध्ये पदार्पण करून आज तेवीस वर्षे झाली
॥ आहेत. १९२० साली कोल्हापूर संस्थानात माणगाव मुक्कामी मी जाहीर सभेचा
| अध्यक्ष या नात्याने प्रथम भाषण केले. तेव्हापासून तो आतापर्यंत मी
| सार्वजनिक कार्य करीत आहे. या तेवीस वर्षातील सार्वजनिक कार्याचा आढावा
| काढला तर त्या कार्याचे तीन भाग पडतील. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय
| है ते भाग होत.
१९२० सालापूर्वीची सामाजिक स्थिती आणि आजची आपली सामाजिक स्थिती
| यांचा विचार केल्यास आपण मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली आहे, असे
| म्हणावयास कोणतीच हरकत नाही. पूर्वी सर्वजण मृतमांस खात
होते. त्यात त्यांना काहीच कमीपणा वाटत नव्हता किंवा लाजही वाटत
नव्हती. परंतु आज ? आपल्यातील सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो,
| पुरुष असो किंवा स्त्री असो, प्रत्येकाच्या मनावर आपण पूर्वी करीत होतो त्या गोष्टी
निंद्य आहेत, असा ठसा बसला आहे. आपले खास हक्क वतन म्हणून आपण
| त्यापूर्वी जतन करीत होतो. परंतु त्या गोष्टी आता आपण वर्ज्यं केल्या
| आहेत. जनावरे ओढण्याची पाळी आता ब्राह्मण, मराठ्यावर आली आहे. हे
भी काल्पनिक सांगत नसून सत्य ते सांगत आहे. रत्नागिरी जिल्हयात महाड
| भुक्कामी कृष्णा नावाचा एक महार होता. तो तेथील कार्यकर्ता होता. महाडच्या | चवदार तळ्याच्या सत्याग्रह चळवळीनंतर तेथील एका ब्राह्मणाची म्हैस
| भैली, ब्राह्मणाने कृष्णाला एकांतात नेऊन म्हैस ओढून नेण्याबद्दल
विनविले. परंतु कृष्णा म्हणाला, ' तात्या हे कसे होईल ? ' तेव्हा निरूपायाने | त्या ब्राह्मणानेच आपल्या मुलास मदतीस घेऊन ती म्हैस जवळच गावाबाहेर
ओढून टाकली ! पण ती म्हैस कुजून, दुर्गंधी सुटली. ब्राह्मणाने पुनः कृष्णाची
विनवणी करून अठरा रुपये देण्याचे आमिष दाखविले. परंतु कृष्णाने त्याला
oe
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : संपादक मा. फ. गांजरे, खंड-२, पुनर्मुद्रण
.१०-४-१९८६, पू. १५३-५६.