११-१-१९४२ आपल्या संरक्षणासाठी संरक्षक दले उभारा - Page 432

३९४ डॉ. वावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे

स्पष्ट नकार दिला. अर्थातच त्या ब्राह्मणाला स्वतःच ती म्हैस तशा स्थितीत ओढून गावापासून दूर तीन मैल अंतरावर नेऊन टाकावी लागली. . या उदाहरणावरून, मी माणूस आहे, माझ्यात पुरुषार्थ आहे, ही जाणीव आपल्यातील प्रत्येकास झाली आहे. तेव्हा, ही एक सामाजिक क्रांती नव्हे काय ?

धार्मिकदृष्ट्या आपण जेवढी क्रान्ती केली आहे तेवढी क्रान्ती कोणत्याही अन्य समाजाने केलेली नाही, हे कोणालाही नाकारता येणार नाही. न्याय, नीती, ` समता, बंधुत्व यावर या हिंदू धर्मामध्ये भर नाही. मनुष्याला जाळणाऱ्या उपाधी मात्र भरपूर आहेत. धर्माच्या नावाखाली आपणाला जे विघातक ते आपण सर्व करीत होतो. परंतु आज धार्मिकदृष्ट्या आपण जितके उज्ज्वल दिसतो तितका दुसरा कोणताच हिंदू समाज दिसत नाही. मराठा, भंडारी या जातीमध्ये शिमग्यातील सोंगे ढोंगे अद्याप सर्रास चालू आहेत. त्यात त्यांना आनंद आणि अभिमान वाटतो. पण आपण हे सर्व सोडून दिले आहे. आपण आता पूर्वीप्रमाणे भक्तिभावाने पोथ्या पुराणे वाचीत नाही. आपल्यातील मंत्रतंत्र, साधुसंत सर्व नामशेष झाले आहेत आणि त्यामुळे आपला समाज अगदी धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ दिसू लागला आहे.

राजकीय प्रगतीबद्दलही तोच प्रकार आहे. अत्यंत अल्प अशा काळामध्ये आपण राजकीय उन्नती करून घेतली आहे, तेवढी इतर कोणत्याही समाजाची झालेली नाही, हे प्रत्येकास मान्य करावे लागेल. सरकारी नोकऱ्या .आणि म्युनिसीपालिट्या, डिस्ट्रिक्ट बोर्डस्‌ इत्यादि स्थानिक स्वराज्य संस्था ही स्पृशांच्ची कायमची खोती बनून गेली होती. आपण फक्त त्यांची गलिच्छ कामे करण्यासाठी होतो. आपला एकही अधिकारी नव्हता. पण आज अशी एकही स्थानिक स्वराज्य संस्था नाही की जीमध्ये आपले लोक नाहीत. ज्यांची सावली घेण्यात येत नव्हती, जे राजकारणात अनाधिकारी ठरले होते ते अस्पृश्य लोक ब्राह्मणांच्या मांडीला मांडी लावून आज देशाच्या कारभारात लक्ष पुरवीत आहेत.

हा सर्वसाधारण असा त्रोटक आढावा आहे. कित्येक लोक म्हणतात की डॉ. आंबेडकरांनी काही केलेले नाही! आजच्याच एका साप्ताहिक वृत्तपत्रात माझ्यावर टीका आली आहे. मी, हिटलर आणि कर्वे असे आम्ही तिघेजण एकाच आठवड्यात जन्मलो. या आधारावरून सदर पत्रकाराने असा निष्कर्ष काढला आहे की हिटलरने कार्य केले, कर्व्यांनी कार्य केले, पण डॉ. आंबेडकरांनी मात्र काहीच केले नाही ! मी काही केले किंवा नाही, हे