३९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मी माझ्या ' श्यामसुंदर ' मधून दलित परिषदेचा सर्व वृत्तांत प्रसिद्ध करणार
आहे. “ अशा प्रकारे राजहंस पाटील यांनी निभिड व सडेतोडपणे आपले मत
मांडून बहिष्काराच्या प्रस्तावाला ठोस विरोध केला आणि त्या वर्तमानपत्रकारांच्या सभेतून बहिर्गमन केले. या विरोधामुळे त्यांचा नियोजित डाव उधळला गेला. (श्री. राजहंस पाटील संपादक, श्यामसुंदर यांनी दिलेली माहिती.) “१
'' दिनांक १८ जुले १९४२ चा दिवस, वेळ सकाळी नऊची. ठिकाण नागपूर रेल्वे स्टेशन. हजारोंच्या संख्येने स्त्री-पुरूषांनी रेल्वे स्टेशनचे सर्व प्लॅटफार्मस् तुडुंब भरून टाकले होते. ' बाबासाहेब आंबेडकर झिंदाबाद ' च्या घोषणा चालू होत्या. समता सैनिक दलाचे सुमारे पाच हजार सैनिक गणवेषामध्ये मोठ्या शिस्तीने उभे राहिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर येत असलेल्या आगगाडीची वेळ झाली होती. त्यांची गाडी नागपूर रेल्वे स्टेशनात आल्याबरोबर बँड व घोषणांचा एकच जल्लोष सुरू झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वेच्या डब्यातून खाली उतरले. त्यांच्या समवेत मद्रासचे एन. शिवराजही होते. शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनची स्थापना करण्यासाठी जी खास परिषद नागपूरला घेण्यात आली होती त्या परिषदेसाठी रेल्वेने येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व एन. शिवराज यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यासाठी तो अलोट जनसमुदाय नागपूर रेल्वे स्टेशनवर जमला होता. भारतातील सर्व प्रांतातील अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी एकजिवाने, मोठ्या उत्साहाने हजर झाले होते. एखाद्या अति प्रचंड लोह चुंबकाकडे लोहाचा कण आणि कण जसा ओढला जातो त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या निष्ठेने तमाम अस्पृश्य जनता नागपूर मुक्कामी जमली होती. एवढी विराट जनता, केवळ अस्पृश्य समाजातीलच नव्हे, तर कोणत्याही समाजातील व कोणत्याही पुढाऱ्यासाठी त्यापूर्वी नागपूरला कधी काळी जमली नसेल, असे ते अभूतपूर्व दृश्य होते.” २ |
““ ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या अगोदर स्वतंत्र मजूर पक्ष | अस्तित्त्वात होता. त्या पक्षातर्फे क्रिप्स मिशनपुढे अस्पृश्यांची राजकीय कैफियत | बाबासाहेबांनी मांडली. तेव्हा क्रिप्ससाहेबांनी असे उद्गार काढले की, मजूर पक्ष काही जातीय राजकारणाचा पाठपुरावा करू शकत नाही. मग ती कैफियत | अस्पृश्य वर्गातफे तुम्ही स्वतः मांडणे तुम्हाला तर्कनिष्ठ दिसते काय ? तुम्ही दुसऱ्या जातीय संस्थेतर्फे कैफियत मांडा. ही दिल्लीत घटना घडली तेव्हा बाबासाहेबांनी सर्व पुढाऱ्यांना तारा पाठवून बोलावून घेतले आणि सर्व परिस्थिती त्यांच्यापुढे ठेवून नवी संस्था काढण्याचा आपला मनोदय प्रकट केला. बाबासाहेबांनी
१ विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास : एच. एल. कोसारे. पु. ५२९.
२ समग्र आंबेडकर चरित्र- बी. सी. कांबळे : खंड १६ वा. पृ. ४७-४८.