डॉ. वाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे ४०४
घेणे देणे, जंगम महिला परिषदेत जे ठराव झाले त्यात घटस्फोट व स्थावर
या ठरावावर खालील इस्टेटीत महिलांना वाटा मिळणे वगैरे प्रमुख ठराव होते.
महिलांची भाषणे झाली.
सौ. राधाबाई कांबळे, जाईबाई चौधरी, कु. मंजुळा कानफाडे, कु. लतिका गजभिये, कु. सुलोचना नाईक, कु. वीरेंद्रबाई तीर्थकर, कु. चंद्रभागा पाटील, कु. कौसल्या नंदेश्वर आणि इंदिराबाई पाटील.
रावबहादूर शिवराज यांनी आपल्या भाषणात अस्पृश्यांच्या राजकीय हक्कासंबंधी केलेल्या चळवळीचा संक्षिप्त इतिहास सांगितला आणि काँग्रेस, हिंदू लोक आणि सरकार यांनी वेळोवेळी स्वीकारलेल्या विरुद्ध भूमिकेबद्दल त्यांना दोष दिला. डॉ. आंबेडकरांनी क्रिप्सबरोबर जी वाटाघाट केली तीत क्रिप्ससाहेबांनी जे विरोधी धोरण स्वीकारले त्याचा संक्षिप्त इतिहास सांगून शिवराज यांनी क्रिप्ससाहेबावर खूप टीका केली. पुणे करारामुळे क अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांवर हव्या त्या मार्गानी आक्रमण करण्यास मिळाला, या मुद्यावर त्यांनी सोदाहरण भाषण केले व पुणे करारात योग्य फेरफार करा, अगर तो करार रद्द करा, अशी मागणी केली.
बाबासाहेबांना अस्पृश्यांतफे मंडपात मानपत्र देण्यात आले. डॉ. बाब आंबेडकरांनी मानपत्राला उत्तर देताना जे भाषण केले त्यात कराराने कॉँग्रेसच्य हाती, अस्पृश्यांना प्राणघातक अशी गोष्ट मिळाली आहे, याचे विवेचन केले आणि सदर करारच रद्द केला पाहिजे अशी मागणी केली.
फर्स्ट अंड सेकंड महार बटालियन्स यांचा तळ कामठी येथे होता.
भेटण्यासाठी यांचे ऑफीसर आले आणि त्यांनी बाबासाहेबांना चहा पार्टीचे आमंत्रण
दिले. बाबासाहेब कामठीला गेले व चहापार्टीनंतर त्यांनी सैनिकांसमोर, त्यां उद्देशून भाषण केले की, महार आणि महाराष्ट्र यांची शूरत्वाची उज्ज्वल परंप तुम्ही सतत डोळ्यापुढे ठेवा आणि मर्दुमकी करून नावलौकीक आणि मिळवा. दोन्ही बटालियन्स, त्यांचे कमांडिंग ऑफिसर्स आणि बाबासाहेब यां
फोटो घेण्यात आला.
फेडरेशनच्या घटनेचा मराठी अनुवाद श्री. सखाराम मेश्राम, वकील, नवी वस्ती, नागपूर यांनी केला आणि तो हरिदास आवळे, कार्यवाह मध्यप्रांत-वऱ्हाड शेड कास्द्स् फेडरेशन, नागपूर, यांनी ३१-१२-१९४२ ला पुस्तकरुपाने प्रसिद्ध केला. किंमत ४ आणे (पाने १५).