लोकशाही जिवंत . .. ... तर विनाश अटळ ४०५
'“ हिंदुस्थानच्या राजकीय जीवनात दलितांना स्वतंत्र व स्वयंपूर्ण दर्जा प्राप्त
करून देऊन त्यांची संख्या, त्यांच्या गरजा व त्यांचे महत्त्व या सर्व बाबीमुळे जे
त्यांना हकक मिळणे अपरिहार्य आहे, ते त्यांचे राजकीय, सामाजिक व आर्थिक
हक्क मिळवून देणे, हे अखिल भारतीय दलित फेडरेशनचे उद्देश आहेत ' असे
भाग (१) यात ध्येय व्यक्त केलेले आहे. घटना २३ भागात लिहिलेली होती
नागपूर परिषदेत मंजूर झालेल्या ठरावाच्या प्रती प्रांतिक गव्हर्नर आणि
| व्हाईसरॉय यांच्याकडे पाठविण्यात आल्या
| नागपूरची परिषद संपल्यानंतर बाबासाहेब मुंबईत आले. दुसऱ्या दिवशी | | त्यांनी यशवंतराव, मुकुंदराव, द्रौपदी व शंकरमामा यांना आपल्या अभ्यासिकेत | बोलावून घेतले. मी दिल्लीला जाणार आहे, तुम्ही सर्वजण नीट रहा आणि माझी
` लायब्ररी व्यवस्थितपणे संभाळा असा उपदेश त्यांनी सर्वांना केला. या सर्वांसाठी
त्यांनी कपडे आणले होते ते त्यांना दिले आणि मग रमाबाईंची आठवण काढून
ते म्हणाले 'ती आता असती तर तिला फार आनंद झाला असता ! तिने माझ्यासाठी
खूप त्रास काढला.' त्यांचा कंठ सद्गदीत झाला. डोळ्यात अश्रू जमा
झाले. त्यांचे अश्रू पाहून सर्वजण रडू लागले." " |
''अखिल भारतीय दलित वर्ग परिषदेतील
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण
अध्यक्ष महाराज, बंधु आणि भगिनींनो,
या परिषदेत बोलताना प्रथमच जाणवणारी मूलभूत अडचण म्हणजे भाषेचा
प्रश्न. या विस्तृत अशा गर्दीत मराठी विभागातून आलेल्या लोकांची संख्या फार
मोठी आहे. म्हणून या परिषदेचा अहवाल त्यांना समजावा, अशी इच्छा
बाळगणाऱ्या माणसाने मराठीतच बोलले पाहिजे. या मराठी भाषी श्रोत्यांशिवाय
-मराठी प्रदेशातूनही अनुसूचित जातीचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. यातील
काही बंगाल, बिहार, मद्रास, आन्ध्र, पंजाब आणि इतर अनेक प्रांतातून आलेले
दिसतात. त्यांनाही या परिषदेचे कामकाज समजण्यासाठी मी इंग्रजीत बोलले
पाहिजे, हे उघडच आहे. ही अडचण टाळण्यासाठी एकदा इंग्रजीत आणि नंतर
मराठीत बोलण्याचे मी ठरविले आहे. म्हणजे मला जे काय सांगावयाचे आहे
ते दोन्ही विभागांना समजेल. आज इंग्रजीत बोलण्याचा माझा मानस
आहे. उद्या मी मराठीत बोलेन.
१ डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड ९ वा, पृ. १२० ते १२७.