१९-७-१९४२ लोकशाही जिवंत राहिली तर तिची फळे क्कीच लाभतील, नपण लोकशाही मेली तर विनाश अटळ - Page 444

४०६ डॉ. बाबासाहेव आंवेडकर लेखन आणि भाषणे

ही परिषद भरविण्यासंबंधीची कल्पना कशी सुचली याविषयी दोन शब्द

उचित होईल असे मला वाटते. तुम्हास आठवत असेल की मागच्या एप्रिलमध्ये

सर स्ट्राफर्ड क्रिप्स यांना भेटण्यासाठी दिल्लीस उपस्थित राहावे, असे मला

बोलावणे आले होते. भारतीय राज्यघटनेत काही बदल सुचविण्यासाठी इंग्रज

सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते आले होते आणि या सूचना भारतातील

वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी स्वीकाराव्या म्हणून त्यांच्याशी वाटाघाटी करण्याची

जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. दिल्लीला जाण्यापूर्वी भारतातील

विविध प्रांतांच्या अनुसूचित जातींच्या प्रतिनिधींना विचारविनिमय करण्यासाठी मी

दिल्लीला बोलाविले होते. सर स्ट्राफर्ड क्रिप्सबरोबर झालेल्या वाटाघाटींचा

निर्णय जेव्हा मी त्यांना निवेदन केला तेव्हा आम्हा सर्वांना कळून चुकले की सर

स्ट्राफड क्रिप्स यांनी ज्या योजना आणल्या होत्या त्या अनुसूचित जातींच्या

कल्याणावर एक भयानक प्राणघातक हल्लाच होता. क्रिप्सच्या योजनांवरील :

माझा दृष्टीकोन एका लेखाद्वारे वर्तमान पत्रातून मी मांडला होता. मला वाटते

तुम्ही तो वाचला असावा. परंतु असे वाटू लागले की अखिल भारतीय अनुसूचित

जातीतफे सर्वसामान्य व सुसंघटित अशी चळवळ करणे फार आवश्यक

आहे आणि केवळ ही सार्वत्रिक चळवळच येऊ घातलेल्या राजकीय विनाशापासून

आम्हाला वाचवू शकेल. अखिल भारतातील सर्व अनुसूचित जातींनी आपल्या

प्रतिनिधिद्वारे दिल्लीला जी इच्छा व्यक्त केली तिचा परिणाम म्हणजेच ही परिषद होय. म्हणूनच या परिषदेच्या पाठीशी अखिल ' अस्पृश्य भारत “ एकसंघपणे उभा आहे. याचकरिता अखिल भारतातून अनुसूचित जातींचे प्रतिनिधी आज आपणामध्ये उपस्थित झालेले आहेत. ही परिषद कोठे घ्यावी याबद्दल विविध प्रांतात बरीच स्पर्धा लागली होती, बंगाल, पंजाब, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि मुंबई यापैकी प्रत्येकाला ही परिषद भरविण्याचे श्रेय आपणास मिळावे असे वाटत होते. शेवटी ही परिषद भरविण्याचे श्रेय मध्यप्रदेशाला द्यावे याबद्दल सर्व सहमत झाले. तथापि, एका अटीसाठी मात्र सर्वांनी आग्रह धरला. ती अट म्हणजे परिषद कोठेही भरली तरी त्या परिषदेचे अध्यक्षस्थान मी स्वीकारावे. ह्या सर्वांशी माझा मतभेद असूनही अखेर अध्यक्षस्थान स्वीकारण्यास मी संमती दिली होती. तेव्हा राजकारणी माणसाच्या वाट्याला येणारे स्वातंत्र्य मी उपभोगत होतो. या परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारून तेव्हा हवे ते विचार बोलून दाखविणे भला शक्य झाले असते. जबाबदारीच्या अधिकारावर असताना निर्माण होणारी बंधने त्यावेळी मुळीच नव्हती. परंतु परिषद घडून येण्याच्या आधीच व्हाईसरॉयच्या