४०८ डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे
अस्पृश्यांनी केलेल्या प्रगतीचा विस्तार लक्षात घेण्याजोग्या स्थितीत सध्याची
अस्पृश्य पिढी नाही. या एवढ्याशा कारणासाठी वीस वर्षापूर्वी ही चळवळ सुरू
झाली तेव्हा त्यांची काय परिस्थिती होती याची त्यांना जाणीव नाही. इंग्लंडवरून
बॅरिस्टर होऊन मी जेव्हा परत आलो तेव्हाच्या मुंबईच्या परिषदेची मला चांगली
आठवण आहे. परिषदेच्या संयोजकाशिवाय एकही वेगळा श्रोता तेथे उपस्थित
नव्हता. काही जण घराच्या दरवाज्याच्या पायच्यावर बिड्या फुंकीत बसले
होते. तर काही लोक कोपप्या कोपऱ्यातून आपसात गप्पा छाटत होते. हे चित्र
पाहा आणि ते चित्र पाहा. येथे तुमच्यासमोर पंच्याहत्तर हजारावर श्रोतृसमुदाय
उपस्थित आहे. वीस वर्षापूर्वीच्या परिरिथतीशी तुलना केली तर आपली
शैक्षणिक प्रगती फार चांगल्या तऱ्हेने होत आहे, असेच म्हणावे लागेल. एकट्या
पुण्यामध्येच पन्नास विद्यार्थी कॉलेजात शिकत आहेत. निरनिराळ्या
विश्वविद्यालयातून ग्रॅज्यूएट झालेल्यांची एकंदर संख्या पाचशेच्या जवळपास
भरेल. काही डॉक्टर आहेत. काही बॅरिस्टरही झालेले आहेत. आपल्या
बांधवांपैकी बरेच जण नगरपालिकांचे व जिल्हा आणि स्थानिक नगरपरिषदांचे
सभासदही आहेत. काही वर्षापूर्वी आपल्या मुलांना शिक्षण घेण्याची मनाई
होती. काही वर्षापूर्वी बाटण्याच्या भितीमुळे अस्पृश्यांना स्थानिक संस्थांचा आणि
नगरपालिकांचा सभासद होण्याची परवानगी नसे. हे सर्व आता बदललेले
आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये मात्र आपल्या अपेक्षेप्रमाणे आपली प्रगती जलद
गतीने झालेली दिसत नाही. तथापि, काही प्रमाणात का होईना तेथेही आपला
प्रवेश झालेला आहे. या बाबतीत पोलीस व सैन्याचा उल्लेख केला
पाहिजे. पोलिस खाते अस्पृश्यांसाठी बंद होते. केवळ साध्या पोलीस
शिपायाची जागासुद्धा अस्पृश्यांसाठी मोकळी नव्हती. निदान काही प्रांतात तरी हो परिस्थिती आता बदललेली आहे. आता आपल्याही लोकांची पोलिस दलात भरती करण्यात येते. सैन्याचाही मला उल्लेख केलाच पाहिजे. १८ ९२ पर्यंत सगळीकडे महार होते, इतकेच नव्हे तर महार सैनिकांची स्वतंत्र पथके होती. १८९२ च्या पुढे महारांचा सैन्यामधील प्रवेश बंद करण्यात आला. १९१४ चे महायुद्ध चालू असताना महारांची सैन्यात भरती करणे पुन्हा सुरू करण्यात आले व महार सैनिकांचे एक पथक उभारण्यात आले. युद्ध संपल्यानंतर ते पथक पुन्हा रद्द करण्यात आले. तथापि, आता आपली सैनिक पथके पुन्हा तयार करण्यात आली आहेत. आपल्या तरुणांना ऑफिसरच्या जागा देण्यात येत आहेत आणि आपल्या पाच-सहा तरुणांना राजपत्रित अधिकाऱ्याच्या जागा सैन्यामध्ये देण्यात आल्या असून तेथे त्यांना सन्मानाचे पद प्राप्त झालेले आहे. आपण केलेली सर्वात मोठी प्रगती आपल्या