१९-७-१९४२ लोकशाही जिवंत राहिली तर तिची फळे क्कीच लाभतील, नपण लोकशाही मेली तर विनाश अटळ - Page 447

लोकशाही जिवंत . ..... तर विनाश अटळ ४०९

स्त्रियांमध्ये आढळून येते. या परिषदेला वीस-पंचेवीस हजार स्त्रिया उपस्थित आहेत हे तुम्ही पाहातच आहात. या अस्पृश्य स्त्रिया आहेत असे कोणी तरी म्हणू शकेल काय ? आपल्या स्त्री वर्गाने केलेली प्रगती फारच आश्‍चर्यकारक व

आपल्या चळवळीचे स्फूर्तिदायक असे स्वरुप आहे. अर्थात हे स्वरुप अत्यंत समाधानकारक असेच आहे. जिच्याबद्दल आपण सर्वांनी अत्यंत अभिमान

बाळगावा अशी ही आपल्या प्रगतीची नोंद आहे. या प्रगतीबद्दल दुसऱ्या कोणाचेही आभार मानण्याचे मुळीच प्रयोजन नाही, अशी ही प्रगती आहे. हिंदू लोकांच्या दयेचा काही हा परिणाम नव्हे. पूर्णतः आपल्या श्रमांना आलेली ही फळे आहेत. ही प्रगती आता पुढेही कशी चालू ठेवावी हा प्रश्‍न आहे. हा असा प्रश्‍न आहे की, तो नेहमी स्वतःला विचारण्याचा आपणाला कधी विसर पडू नये. वेगवेगळ्या जातींच्या स्पर्धेमध्ये एखाद्या जातीची प्रगती झालेली दिसून येत असेल तर ती त्या जातीजवळ असणाऱ्या एखाद्या शक्‍तीचा केवळ परिणाम मात्र होय. ही शक्ती आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय

असेल. आपली प्रगती तशीच पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्याजवळ शक्‍ती आहे

काय ? आपल्याजवळ आर्थिक शक्ती आहे काय ? मला खात्री आहे की,

आपल्याजवळ मुळीच नाही. आपण केवळ गुलामाची जात आहोत. आपणाजवळ

सामाजिक शक्‍ती आहे काय ? मला खात्री आहे की, हीही आपल्याजवळ शून्यच

आहे. मानव जातीचा अवमानित असा आपण एक भाग आहोत. म्हणूनच

आपल्या सतत प्रगतीसाठी जिच्यावर आपण अवलंबून राहू शकू अशी एकच गोष्ट

आहे व ती म्हणजे राजकीय शक्ती हस्तगत करणे. या शक्तीशिवाय आमचा

सर्वनाश होईल. आमच्या मुक्तीचा तो एकच मार्ग आहे, याबद्दल मला तर मुळीच

संदेह नाही. म्हणूनच या प्रश्‍नावर आपण सर्वांनी आपले लक्ष केन्द्रित केलेच

पाहिजे. हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्‍न आहे. राजकीय शक्ती हस्तगत

करण्याच्या दृष्टीने आपले भवितव्य काय आहे ? आपणाला सहाय्यभूत

असणाऱ्या व आपल्या विरोधी काम करणाऱ्या शक्तींचा थोडक्यात आढावा घेणे

उत्तम होईल. अशा शक्तींची जाणीव झाल्यानंतर तुमचे पुढील धोरण आखणे

तुम्हाला सोईचे होईल व एखाद्या गोष्टीला तुम्ही तावून सुलाखून मंजुरी द्याल.

माझ्या राजकारणाची गुरुकिल्ली कोणती हे सांगण्यापासून मी सुरूवात

करतो. कदाचित ती तुमच्या परिचयाचीही असेल. तरीसुद्धा ती पुन्हा सांगणे

उचितच आहे. अस्पृश्य लोक हिंदुंचा एक विभाग अथवा उप-विभाग नसून

भारताच्या राष्ट्रीय जीवनातील तो एक स्वतंत्र आणि ठळक असा घटक आहे, हा

सिद्धांत माझ्या राजकारणाचा पांया आहे. मुसलमान हिंदू समाजापासून जितके